Header Ads

वाशिम जिल्ह्यात आचारसंहिता भंगाच्या २२ तक्रारी निकाली - Washim district : 22 complaints of violation of code of conduct resolved


वाशिम जिल्ह्यात आचारसंहिता भंगाच्या २२ तक्रारी निकाली

८१ लाख ६५ रुपयांची मालमत्ता आजपर्यंत जप्त

  Washim district : 22 complaints of violation of code of conduct resolved  

            वाशिम, दि. १२ नोव्हेंबर (जिमाका / www.jantaparishad.com) -  विधानसभा सार्वत्रिक निवडणूक - २०२४ साठी  १५ ऑक्टोबर ते ११ नोव्हेंबर २०२४ पर्यंत जिल्ह्यात सी-व्हिजिल (C-Vigil app) ॲपवर एकूण २२  तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यापैकी २२ ही तक्रारी  निकाली काढण्यात आल्या आहेत, अशी माहिती निवडणूक विभागाने दिली आहे.

नागरिकांना आचारसंहिता पालनासाठी सहकार्य करणारे सी-व्हिजिल (C-Vigil app) ॲप हे कोणत्याही ॲपस्टोअरमधून डाऊनलोड करता येते. या ॲपद्वारे नागरिकांना आचारसंहिता भंगाबाबत तक्रार करता येते. तक्रार दाखल झाल्यानंतर संबंधित पथकाद्वारे चौकशी करुन योग्य ती कारवाई करण्यात येते.

८१ लाख ६५ हजार रुपयांची मालमत्ता जप्त

राज्य व केंद्र शासनाच्या विविध अंमलबजावणी यंत्रणांद्वारे करण्यात आलेल्या कारवाईत बेकायदा पैसे, दारू, अंमली पदार्थ व मौल्यवान धातू इत्यादी बाबतीत दि. १५ ऑक्टोबरपासून आजपर्यंत एकूण ८१ लाख ६५ हजार रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली असून आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी सुरु आहे.

कोई टिप्पणी नहीं

Blogger द्वारा संचालित.