वाशिम जिल्ह्यात ५ वाजेपर्यंत सरासरी ५७.४२ टक्के मतदान - voting in Washim, karanja, risod election 2024
विधानसभा सार्वत्रिक निवडणुक २०२४
वाशिम जिल्ह्यात ५ वाजेपर्यंत सरासरी ५७.४२ टक्के मतदान
युवा,दिव्यांग आणि ज्येष्ठ मतदारांचा उत्साह वाखाणण्याजोगा
voting in Washim, Karanja, Risod vidhansabha election 2024
वाशिम, दि. २० नोव्हेंबर (जिमाका) : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज २० नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात तीन विधानसभा मतदारसंघात मतदान प्रक्रिया पार पडली. ५ वाजेपर्यंत जिल्ह्यात सरासरी ५७.४२ टक्के मतदान झाले. शनिवार, २३ नोव्हेंबर रोजी तिन्ही विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी स्तरावर मतमोजणी केली जाणार असून याकरिता प्रशासनाची तयारी पूर्ण झाली असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी बुवनेश्वरी एस यांनी दिली.
जिल्ह्यात ३३ रिसोड विधानसभा मतदारसंघात पुरुष १ लक्ष ६८ हजार ६६२ , महीला १ लक्ष ५५ हजार ७३०, असे एकूण ३ लक्ष २४ हजार ३९२ , ३४ वाशिम विधानसभा मतदारसंघात पुरुष १ लक्ष ९१ हजार १२७, महीला १ लक्ष ७७ हजार ३३७ असे एकूण ३ लक्ष ६८ हजार ४७४ , ३५ कारंजा विधानसभा मतदारसंघात पुरुष १ लक्ष ६२ हजार ६९ , महिला १ लक्ष ५४ हजार १६३ असे एकूण ३ लक्ष १६ हजार २४१ मतदार असून जिल्ह्यात ५ लक्ष २१ हजार ८५८ पुरुष, ४ लक्ष ८७ हजार २३० महिला व १९ तृतीयपंथी असे एकूण १० लक्ष ९ हजार १०७ मतदार आहेत.
३३ रिसोड विधानसभा मतदारसंघात ५ वाजेपर्यंत ६०.१८ टक्के,
३४ वाशिम विधानसभा मतदारसंघात ५६.८७ टक्के आणि
३५ कारंजा विधानसभा मतदारसंघात ५५.२२ टक्के मतदान झाले आहे.
जिल्ह्यात एकूण ५७.४२ मतदान झाले.
जिल्ह्यातील एकूण १० लक्ष ९ हजार १०७ मतदारांपैकी ५ लक्ष ७९ हजार ३९१ मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला.
मतदारांचा उत्साह वाढविण्यासाठी आकर्षक रांगोळ्या काढून मतदान केंद्रांचे सजावटीकरण करण्यात आले होते
मतदारांसाठी सुविधा
मतदान केंद्रांवर पिण्याचे पाणी, विद्युत पुरवठा, मतपत्रिका, स्वयंसेवक आदी किमान सुविधा पुरविण्यात आल्या. सर्व मतदान केंद्रांवर दिव्यांग तसेच वयोवृद्ध मतदारांकरिता व्हीलचेअर व रॅम्पची व्यवस्था करण्यात आली. तसेच दिव्यांग बांधवांसाठी, ज्येष्ठ नागरिकांच्या मदतीसाठी स्वयंसेवक नियुक्त केले होते.
वेब कास्टिंगद्वारे थेट नजर
जिल्ह्यातील ५५२ मतदान केंद्रांवरील मतदान प्रक्रियेवर 'वेब कास्टिंग' द्वारे थेट नजर ठेवण्यात आली. मतदान केंद्रांवर ‘सीसीटीव्ही’द्वारे निवडणूक यंत्रणेने थेट नजर ठेवत वेळोवेळी आढावा घेतला.
शनिवारी होणार मतमोजणी
जिल्ह्यातील तिन्ही विधानसभा मतदारसंघांच्या निवडणूक निर्णय अधिकारी स्तरावर शनिवार २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. रिसोड येथील मतमोजणी तहसील कार्यालय प्रशासकीय इमारत येथे, वाशिम येथील मतमोजणी बसस्थानक जवळील कोरोनेशन क्लब येथे तर कारंजा येथील मतमोजणी कृषि उत्पन्न बाजार समितीमधील शेतकरी निवास गोडाऊनमध्ये होणार आहे.
Post a Comment