Header Ads

३५ - कारंजा विधानसभा मतदार संघ निवडणूक २०२४ : १६ जणांनी अर्ज घेतले मागे - News form withdrawal Karanja Assembly constituency

३५ - कारंजा विधानसभा मतदार संघ निवडणूक २०२४ : News form withdrawal Karanja Assembly constituency


३५ - कारंजा विधानसभा मतदार संघ निवडणूक २०२४ 

१६ जणांनी अर्ज घेतले मागे 

निवडणूक रिंगणात आता २७ उमेदवार  

कारंजा दि. ०४ (www.jantaparishad.com) : ३५ - कारंजा विधानसभा मतदार संघाच्या २० नोव्हेंबर रोजी होऊ घातलेल्या निवडणुकीसाठी चे नामांकन मागे घेण्याचे शेवटचे दिवशी आज ४ नोव्हेंबर रोजी एकूण ४३ पैकी १६ जनांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. यामुळे आता निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची संख्या २७ इतकी राहिली आहे. अशी माहिती एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे निवडणूक निर्णय अधिकारी कैलाश देवरे यांनी दिली आहे. 

आज निवडणूक अर्ज मागे घेणार्यांमध्ये गोपाल मनोहर घोडे, सय्यद नासिरोद्दिन सय्यद राहिमोद्दिन, देवानंद नरसिंग पवार, डॉ. श्याम विजय जाधव, जयकिसान बाबन राठोड, अनिल गजाधर राठोड, निकेश सुनील गावंडे, रामनाथ प्रह्लाद राठोड, अशोक कनीराम जाधव, प्रणीत देवानंद मोरे, ज्योती मंदकला अनिल गणेशपुरे, किशोर भोजराज मानकर, ज्ञानेश्वर भीमराव मोडक, भारत पुरुषोत्तम भगत, गजाला यास्मिन मारुफ खान  आणि इम्रान शेरूभाई फाकीरावाले यांचा समावेश आहे. 

आता नेमकी लढत कशी होते याकडे सर्व सामान्य जनतेचे लक्ष लागले आहे. 

form withdrawal karanja assembly constituency



कोई टिप्पणी नहीं

Blogger द्वारा संचालित.