Header Ads

स्वर्गीय आमदार राजेंद्र पाटणी साहेब यांना अनेकांनी दिली श्रध्दांजली Tribute to late Mla Rajendra Patni

स्वर्गीय आमदार राजेंद्र पाटणी साहेब यांना अनेकांनी दिली श्रध्दांजली Tribute to late Mla Rajendra Patni


पाटणी साहेबांना श्रद्धांजली देताना अनेकांनी अश्रुंना करून दिली मोकळी वाट

स्वर्गीय आमदार राजेंद्र पाटणी साहेब यांना अनेकांनी दिली श्रध्दांजली

कारंजा दि. ०१ :- दिनांक २९फेब्रुवारी रोजी स्व. आमदार राजेंद्र पाटणी साहेब यांच्या अस्थि कलश दर्शन व सर्व पक्षीय श्रध्दांजली कार्यक्रमात अनेक राजकीय पक्ष, सामाजिक संघटना, संस्था, नागरीक यांनी भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण केली. कारंजा येथील महेश भवन येथे हा कार्यक्रम संपन्न झाला. स्व. आमदार राजेंद्र पाटणी यांचा अस्थि कलश येथे दर्शनाकरीता ठेवण्यात आला होता . उपस्थित अनेक मान्यवरांनी श्रध्दांजली देतांना आपल्या भावना व्यक्त केल्या आमदार राजेन्द्र पाटणी यांच्या संपर्कातील अनेक अनुभव यावेळी सांगितले. भावपूर्ण श्रध्दांजली देतांना अनेकांना अश्रु अनावर झालेत.  राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अण्णाजी करडे , माजी नगराध्यक्ष नरेन्द्रजी गोलेच्छा, माजी  नगराध्यक्ष उर्मिलाताई इंगोले, प्रदेश काँग्रेसचे सचिव दिलिप भोजराज , कारंजा नागरी सहकारी पतसंस्थेचे राजाभाऊ डोणगावकर, माजी जिल्हा परिषद सभापती जयकिसनभाऊ राठोड, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा सौ.ज्योतीताई गणेशपुरे, जे सी शाळेचे, जैन संघटनेचे शिरीष सावजी चवरे,कारंजा भारत गॅस चे, कॅन्सर रिलीफ सेंटरचे शेखर भाऊ बंग, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक प्रवीण भाऊ वानखडे, डॉक्टर अजय कांत, संघटनेचे पत्रकार संघटनेचे प्राध्यापक शेख सर , जेडी चवरे शाळेचे श्रीनिवास जोशी, जैन संघटनेचे राजुभाऊ खंडारे, सिंधी समाजाचे भगवान खेमवाणी, संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती रवी भाऊ घुले, भारिपचे तालुका अध्यक्ष नागेश पाटील, अ. भा. जैन अल्प संख्यांक संघटना संतोष दगडे, पत्रकार दिलीप सावजी राउळ, भाजपा वतीने तालुका अध्यक्ष डॉ राजीव काळे ईत्यादि मान्यवरांनी श्रध्दांजली अर्पण केली.प्रदेश काँग्रेसचे सचिव दिलीप भोजराज यांनी आपल्या भावपूर्ण श्रद्धांजलीत सांगितले की, "मी आजारी झालो होतो. आमदार राजेंद्र पाटणी असे एकमेव व्यक्ती आहेत त्यांनी विचारपुस केली आणि सांगितले की काही काळजी करु नका मी तुमच्या सोबत आहे. सर्व मदत केली." असे सांगतांनी त्यांना या घटनेचे स्मरण झाले आणि त्यांना अश्रु अनावर झाले. पुढे बोलतांना त्यांनी सांगितले की, मी त्यांच्या पक्षाचा नव्हतो . असे व्यक्ती आपल्यातून निघून गेली याचे दुःख आहे . चंद्रकांत हंडोरे साहेबांच्या वतीने सुद्धा त्यांनी श्रध्दांजली अर्पण केली.

उपरोक्त मान्यवरांनी सर्वांनी आप आपले अनुभव सांगितले. सर्वांनी साहेबांसी त्यांचे असलेले सबंध, संपर्क,अनुभव, त्यांची काम करण्याची पध्दत, वेळ प्रसंगी कार्यकर्त्यांसोबत , नागरीक यांच्या सोबत ताकदीने उभे राहण्याचे प्रसंग, त्यांच्या अचानक जाण्याने त्यांच्या कुटुंबावर ओढवलेले दुःख यात सामील असल्याचे सांगुन त्यांना दुःख सहन करण्याची शक्ती मिळो अशा भावना व्यक्त केल्यात आणि आपण खचून न जाता या अचानक आलेल्या संकटावर मात करत ताकदीने सांभाळा असे सांगितले. उपस्थित पत्रकाराचे , पत्रकाराचे वतीने पत्रकार प्राध्यापक शेख सर यांनी श्रध्दांजली देतांना सांगितले की, पाटणी साहेबांच्या मृत्यूची बातमी मला माझ्या मित्रांकडून कळताच माझ्या तोंडून ते शब्द निघाले जे आमच्यातील आप्त यांच्या विषयी दुःखद बातमी कळताच  काढले जातात. जातीभेद न पाळणारे व्यक्तिमत्व होते. ज्याप्रमाणे विद्या विनयन शोभते त्याचप्रमाणे संपत्ती सत्ता पाटणी साहेबांना शोभते असे गौरवो्गार त्यांनी काढलेत. पाटणी साहेबांच्या अस्थिकल दर्शन व श्रद्धांजली कार्यक्रमासाठी आलेल्या ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांनी येथे उपस्थित सर्वांनी अस्थिकलशाचे दर्शन घेतले. या कार्यक्रमास मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.  

यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ विश्व हिंदू परिषद बजरंग दल राष्ट्रीय काँग्रेस पक्ष ,भारिप, भारतीय जैन अल्पसंख्यांक समिती ,शरद व्याख्यानमाला ,कॅन्सर रिलीफ सेंटर, गो ग्रीन फाउंडेशन, दिशा आय फाउंडेशन, यशवंत गृहनिर्माण संस्था ,नूतन कॉलनी, प्रोफेसर कॉलनी बाबरे कॉलनी, जिव्हाळा परिवार, श्रीराम व्यायाम शाळा ,कृषी उत्पन्न बाजार समिती ,राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ,शिवाय नमः मठ, ओम मित्र मंडळ, श्री गुरु मंदिर संस्थान ,विश्व मांगल्य सभा, बजरंग पेठ, जेसी हायस्कूल ,जेडी चवरे ,माळीपुरा ,माळी समाज ,सिंधी पंचायत ,भीमशक्ती ,झाशी राणी चौक, कारंजा नागरी सहकारी पतसंस्था, तालुका पत्रकार संघ ,नागनाथ  व्यायाम शाळा, नेवी समाज, तेली समाज ,वाल्मिकी समाज इत्यादी सह अन्य कडून श्रध्दांजली देण्यात आली. 

यावेळी  भाजपा प्रदेश जैन प्रकोष्ठचे पदाधिकारी ज्ञायकभाऊ पाटणी , भाजपा शहर अध्यक्ष ललित चांडक, भाजपा जिल्हाध्यक्षशाम बढे सहजिल्हा भाजपाचे पदाधिकारी, तालुका पदाधिकारी शहर पदाधिकारी , महिला पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते. तसेच भाजपाचे जिल्हा परिषद ,पंचायत समिती, नगरपरिषद, ग्रामपंचायत, सदस्य,सरपंच ,यांच्या सह अन्य पक्षाचे व ईतर पक्षाचे मान्यवर उपास्थित होते. मानोरा तालुक्यातील भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते, स्थानीक स्वराज्य संस्थेचे लोक प्रतिनिधी उपस्थीत होते. वाशिम येथून काही मान्यवर उपस्थित होते.

उमेश माहितकर यांनी पुर्ण कार्यक्रमाचे संचलन , प्रास्ताविक केले.हभप विनायक गुंजाटे महाराज यांच्या संचलनात कार्यक्रमात उपस्थितांनी सार्वजनिक श्रध्दांजली दिली. असे संजय भेंडे भाजपा तालुका प्रसिध्दी प्रमुख यांनी कळविले.

No comments

Powered by Blogger.