Header Ads

३ मार्च रोजी राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम - pulse polio vaccination in Washim district on 3rd march

३ मार्च रोजी राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम - pulse polio vaccination in Washim district on 3rd march


३ मार्च रोजी जिल्हयातील १ लक्ष २८ हजार बालकांना मिळणार 'दो बूंद जिंदकी के'

राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम 

वाशिम, (जिमाका) दि. २८ - संपुर्ण राज्यात दि.०३ मार्च २०२४ रोजी राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम १ टप्पा राबविण्यात येणार आहे. ०-५ वर्षाखालील बालकाचे लसीकरण करावयाचे आहे तसेच त्यानंतर दि. ०५ मार्च २०२४ पासुन बुथवरील ज्या बालकाचे लसीकरण झाले नाही अशा बालकांकरीता ग्रामिण भागात ३ दिवस व शहरी भागात ५ दिवस घरोघरी जावुन जावुन सर्व्हेक्षण करून लसीकरण करण्यात येणार आहे.

सदर राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीमेतंर्गत जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस व मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा समन्वय समितीची सभा दि. ०९ फेब्रुवारी २०२४ रोजी घेण्यात आली व याबाबत सविस्तर चर्चा करण्यात येवून संबधित यंत्रणेने सर्वतोपरी सहकार्य करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत . दि. १२ फेब्रुवारी २०२४ रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी  यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हयातील सर्व ग्रामीण व शहरी भागातील आरोग्य संस्थेच्या वैद्यकिय अधिकारी याचे एक दिवसीय प्रशिक्षण आयोजीत करण्यात आले होते. त्यामध्ये विभागीय सर्वेल्नस अधिकारी श्री ठोसर यांनी सदर प्रशिक्षण घेतले व जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी जिल्हयातील एकही लाभार्थी सदरील लसीकरणापासुन वंचीत राहणार नाही याची खबरदारी घेण्याच्या सूचना संबंधितांना केल्या आहेत.

वाशिम जिल्हयातील सहा तालुक्यामध्ये १ जिल्हा रुग्णालय, १ महिला रुग्णालय, १ उपजिल्हा रुग्णालय २७ प्रा.आ.केंद्र व ०६ ग्रामीण रुग्णालये असुन जिल्हयाची ग्रामीण लोकसंख्या १०लक्ष २५ हजार ४९५ व नागरी भागाची लोकसंख्या २लक्ष ६५ हजार २५७ अशी एकुण १२ लक्ष ९० हजार ७५२ आहे. जिल्हयामध्ये अंदाजीत घरांची संख्या ग्रामिण भागात २ लक्ष ३ हजार ९७७ व नागरी भागात ५१ हजार ९७५ अशी एकुण २ लक्ष ५५ हजार ९५२ आहे.

जिल्हयामध्ये ० ते ५ वर्षाच्या वयोगटातील अपेक्षित लाभार्थीची संख्या ग्रामीण ९१ हजार ६६५ व नागरी भागात ३६ हजार ६११ अशी एकुण १लक्ष २८ हजार २७६ एवढी आहे. सदर मोहीम यशस्वीपणे राबविणेकरीता २०८ आरोग्य पर्यवेक्षकांची नेमणूक करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, वाशिम यांनी दिली आहे.


No comments

Powered by Blogger.