Header Ads

निवडणुक विषयक तक्रारींकरीता ७७९७३३३९८२ वर संपर्क साधावा - For election related complaints contact 7797333982

जिल्हा पोलिस अधीक्षक अनुज तारे (Washim SP Anuj Tare)


यवतमाळ वाशिम लोकसभा मतदार संघ

लोकसभा सार्वत्रिक निवडणुक २०२४ 

निवडणुक विषयक तक्रारींकरीता ७७९७३३३९८२ वर संपर्क साधावा 

जिल्हा पोलिस अधीक्षक अनुज तारे यांचे आवाहन 

वाशिम, दि.6  (जिमाका/ www.jantaparishad.com) - लोकसभा सार्वत्रिक निवडणुक २०२४ ची आदर्श आचार संहिता लागु झाली असुन यवतमाळ वाशिम लोकसभा मतदार संघाचे (Yavatmal Washim Lok Sabha Constituency 2024) २६ एप्रिल रोजी मतदान होणार असुन निवडणुक निर्भय व शांत वातावरणात पार पडावी याकरीता नागरिकांकडून निवडणुक संबंधीत प्राप्त होणाऱ्या तक्रारी व सोशल मिडीयावर प्रसारीत होणाऱ्या संवेदनशिल / फेक न्यूजवर लक्ष ठेवुन दाखल तक्रारींवर तात्काळ कायदेशीर कार्यवाही करणे करीता ७७९७३३३९८२ (7797333982) मोबाईल क्रमांक हा जनमानसात प्रसिध्दीकरीता देण्यात येत आहे.


तरी ७७९७३३३९८२ मोबाईल क्रमांकावर निवडणुक संबंधाने सोशलमिडीयाद्वारे आदर्श आचार संहिता भंग करतांना आढळुन आल्यास तात्काळ तक्रार देण्यात यावी जेणे करून मतदान काळात कोणताही अनुचीत प्रकार घडणार नाही व मतदान प्रक्रीया सुरूळीत पार पाडता येईल.


जिल्हयात लोकसभा निवडणुकीदरम्यान सार्वजनिक सुव्यवस्था अबाधित राहुन शातंता राहावी याकरीता सोशल मिडीया द्वारे गुन्हे करणाऱ्यावर सायबर विभाग लक्ष ठेवून आहे. सार्वजनीक सुव्यवस्थेस बाधा पोहचविणाऱ्यां कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे जिल्हा पोलिस अधीक्षक अनुज तारे (Washim SP Anuj Tare) यांनी कळविले आहे.

No comments

Powered by Blogger.