Header Ads

प.पू.आचार्यश्री विद्यासागरजी महाराज यांना विनयांजली - Acharya Vidyasagarji Maharaj Vinayanjaliदि.जैन महासमिती  कारंजा संभाग तर्फे प.पू.आचार्यश्री विद्यासागरजी महाराज यांना विनयांजली

 कारंजा दि. २८ (www.jantaparishad.com) - जैनाची काशी कारंजा लाड येथे  युगप्रवर्तक , विश्वगुरू संत शिरोमणी आचार्यश्री यांना दि.25/2/2024 रोजी जैन समाजातर्फे सामुहिक  विनयांजली अर्पित करण्यात आली. प.पू.आचार्यश्री विद्यासागर महाराजजींचे समाधीमरण दि. 18/2/2024 ला झाले.प.पू.आचार्यश्रीच्या पुर्वाश्रमीच्या जीवनातील पुतणी सौ.दिपिकाताई हितेश रुईवाले ,बा.ब्र.भारतीदिदी.दि. जैन महिला महासमिती संभाग  अध्यक्षा सुलभाताई फुरसुले , दि.जैन पुरुष महासमिती महिला प्रकोष्ठ जयश्री चाणेकर, दि.जैन पुरुष महासमिती अध्यक्ष प्रविणजी फुरसुले, श्री.हितेशजी रुईवाले  दि.बालात्कार जैन मंदीरचे ट्रस्टी श्री .उज्वलजी रायबागकर, श्री.प्रमोद कहाते, श्री.सुदेशजी गुळकरी,श्री राजेंद्र खंडारे, श्री.नितीनजी चढार यांच्या हस्ते दिपप्रज्वलन केले.मंगलाचरण  सौं मिनाक्षी गुळकरी यांनी सादर केले.श्रावकांनी आचार्यश्रीविषयी आपले अनुभव व्यक्त करून विनयांजली अर्पित केली.सर्वांनी आपल्या घरून दिवे आणून सामुहिक आरती केली.जिनवाणी स्तुतीनंतर समारोप करण्यात आला.

कार्यक्रमाच्या यश्स्वितेसाठी दि.जैन महासमिती कार्यकारीणी  तथा  सर्व  सदस्य आणि श्रावकांनी  सहकार्य केले .

कार्यक्रमाचे संचालन श्री.पवन उखळकर यांनी केले.

No comments

Powered by Blogger.