Header Ads

स्व. आमदार राजेंद्र पाटणी यांच्या अस्थी कलश दर्शन Asthi kalash darshan shradhanjali karyakram

स्व. आमदार राजेंद्र पाटणी यांच्या अस्थी कलश दर्शन Asthi kalash darshan shradhanjali karyakram


स्व. आमदार राजेंद्र पाटणी यांच्या अस्थी कलश दर्शन व सर्व पक्षीय श्रद्धांजली कार्यक्रम उद्या २९ फेब्रुवारी रोजी

कारंजा दि. २८ - उद्या  दिनांक २९ फेब्रुवारी गुरुवारी कारंजा येथील महेश भवन येथे दुपारी ०१ वाजता स्व. आमदार राजेंद्र पाटणी यांच्या अस्थी कलश दर्शन व सर्व पक्षीय श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

कारंजा- मानोरा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय, कर्तव्यनिष्ठ ,विकासपुरुष, लोकनेते, दिवंगत आमदार श्रद्धेय राजेंद्रजी पाटणी साहेब यांचे दि.२३/०२/२०२४ रोजी दुःखद निधन झाले .गुरुवार दि. २९ /०२/ २०२४ ला दुपारी १ वाजता   महेश भवन येथे अस्थी कलश दर्शनासाठी ठेवण्यात येणार  आहे.अस्थी कलश दर्शन व सर्व पक्षीय श्रद्धांजलीचा कार्यक्रम आयोजीत करण्यात आला आहे. 

आपल्या लाडक्या नेत्याला श्रद्धांजली देण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते  व ईतर पक्षाच्या पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी उपस्थित रहावे तसेच भाजपा पदाधिकारी कार्यकर्त्यांनी, नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे अशी विनंती भाजपा तालुकाध्यक्ष डॉ.राजीव काळे, भाजपा शहराध्यक्ष ललित चांडक यांनी केलीआहे.असे संजय भेंडे भाजपा तालुका प्रसिध्दी प्रमुख यांनी कळविले .

No comments

Powered by Blogger.