Header Ads

श्री शिव व्याख्यान - Shri shiv vykhyan by patrakar sangh

श्री शिव व्याख्यान - Shri shiv vykhyan by patrakar sangh


शत्रूंच्या आई बहिणींचेही रक्षण करणारे छत्रपती शिवाजी महाराज - शिवव्याख्याते शेख सुभान अली 

श्री शिव व्याख्यान - महाराष्ट्र बहुजन पत्रकार संघाचा उपक्रम 

कारंजा दि. २४ - सार्वजनिक शिवजयंती उत्सव २०२४ निमित्त कारंजातील महाराष्ट्र बहुजन पत्रकार संघाच्या वतीने कारंजा येथे २२ फेब्रुवारी 2024 रोजी सायंकाळी ७ वाजता स्थानिक मुलजी जेठा हायस्कूल च्या प्रांगणात श्री शिव व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.

   व्याख्यानमालेमध्ये शिवव्याख्याते शेख सुभान अली यांनी आपल्या छत्रपती शिवरायांचे धर्म निरपेक्ष सूराज्य या विषयातून श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले होते. सदर व्याख्यान छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास हा अनेक वैभवशाली पराक्रमाने आणि सामाजिक ऐक्याच्या दृष्टीने मानवता धर्म वाढविण्यासाठी इतिहासाचा सुवर्णकाळ होता. छत्रपती  शिवराय हे मानवता धर्माचे रक्षक होते. त्यांच्या राज्यात सर्व समाजातील धर्मातील जातिपंथातील लोकांना सारखं न्याय होता. मात्र शिवाजी राजांना सर्व समावेशक करण्यात आम्ही लोक कमी पडत आहोत. त्यामुळे काही डोके छत्रपती शिवाजी महाराजांना आपण जाती धर्माच्या गराड्यात बंदिस्त करण्याचां प्रयत्न करीत आहोत, ही बाब महापुरुषांना संकुचित करणारी आहे.  छत्रपती शिवाजी राजे हे सर्व समाजाचे छत्र होते अशा छत्रपतींना आपण कोणत्याही जाती धर्मात अडकवू शकत नाही छत्रपती शिवाजी महाराज हे कोणी ऐका धर्माचे रक्षक नव्हते तर सर्व मानवधर्माचे रक्षक होते त्यांनी मानव धर्माचे पालन करण्याचा संदेश दिला त्यांचे जीवन चरित्र हे मानव मानवामध्ये जातीभेद नष्ट करून धर्मनिरपेक्ष सुराज्य उभे करण्यासाठी मार्गदर्शक होते असे  परखड मत  महाराष्ट्र बहुजन पत्रकार संघाच्या वतीने आयोजित व्याख्यान कार्यक्रमात बोलताना  प्रमुख वक्ते तथा शिव अभ्यासक तथा व्याख्याते शेख सुभान अली यांनी व्यक्त केले.

  कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कारंजा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती श्रीमती सईताई डहाके होत्या तर प्रमुख पाहुण्यां मध्ये उपस्थिती म्हणून कारंजा उपविभागाचे उपविभागीय अधिकारी ललित वराडे, तहसीलदार कुणाल झाल्टे ,प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष हेमेंद्र ठाकरे, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीयअधीक्षक डॉक्टर भाऊसाहेब लहाने, नगर परिषद गट नेता एड.फिरोज शेखुवाले , मराठा सेवा संघाचे तालुका अध्यक्ष राजेंद्र मोडक, श्रीमती राधाताई मुरकुटे, नगरपालिकेचे उपमुख्यअधिकारी निशिकांत परळीकर ,आदींची उपस्थिती होती.

   शिव व्याख्यान या कार्यक्रमांमध्ये काही नामांकित व सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या व्यक्तींचा गौरव करण्यात आला. यामध्ये आरोग्य क्षेत्राशी निगडित उत्कृष्ट आरोग्य सेवा पुरवणारे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर भाऊसाहेब लहाने, जिल्हा नियोजन समितीवर निवड झालेले पत्रकार हमीद शेख, बहुजन पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष बंडूभाऊ इंगोले, मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष पदी निवड झालेले  सुधीर देशपांडे,जिल्हा मुकुनायक पत्रकार पुरस्कार प्राप्त सो मोनाली गणवीर कला व सांस्कृतिक क्षेत्रात कार्य करणारे तथा दिग्दर्शक उमेश गवळीकर व त्यांच्या समूह, शिक्षण क्षेत्रात उत्तुंग भरारी घेणारे पत्रकार विजय भड, साहित्यिक पत्रकार योगेश यादव व कोरोना काळात सर्वांचे मन रमविणारे टीचर टकाटक चे युट्युबर सुरेश राऊत तथा अर्चना राऊत, सामाजिक कार्यकर्ते जिग्नेश लोढाया आपत्ती व्यवस्थापनात उत्तुंग भरारी घेणारे शाहू भगत, शाम सवई ,दीपक सदाफळे, रमेश देशमुख व पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष आरिफ पोपटे आदींचा  सत्कार करण्यात आला 

कार्यक्रमाच्या कार्यक्रमाची प्रस्तावना बंडु भाऊ इंगोले ,वक्त्यांच्या परिचय विजय भड यांनी दिला तर  संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्र संचालन हेमंत पापळे व रामदास मिसाळ यांनी केले यशस्वीतेसाठी महाराष्ट्र पत्रकार संघाचे सागर अंभोरे, विजय भड आणि आरिफ पोपटे रामदास मिसाळ ,दिनेश रघुवंशी, धनंजय राठोड दामोदर जोंधळेकर ,विजय खंडाऱ,महेंद्र गुप्ता,संदीप कुरहें ,पवनकुमार कदम, पवन गुप्ता, विनोद गणवीर ,हेमंत पापळे, निलेश मुंदे, गजानन टोंपे ,सलीम खान, निलेश काळे,मयुरी गुप्ता ,धनराज राठोड,मंगेश बाबरे,रवींद्र इंगळे, महादेव जाधव, मंगेश बाबरे, राजेंद्र श्यामसुंदर ज्ञानेश्वर वर्घट, मोहम्मद मुन्नीवाले, दीपक इंगळे, उषा नाईक, कालू भाई तवांगर,दादाराव बहुटे,मयूर राउत,महादेव राउत,विनोद गणवीर, आदींनी अथक परिश्रम घेतलेत

No comments

Powered by Blogger.