Header Ads

Bogus work by Karanja nagar Parishad in new areas - कारंजा नगर परिषदेच्या वाढीव हद्दीतील विकासकामे अगदी निकृष्ट दर्जाचे

Bogus work by Karanja nagar Parishad in new areas - कारंजा नगर परिषदेच्या वाढीव हद्दीतील विकासकामे अगदी निकृष्ट दर्जाचे


कारंजा नगर परिषदेच्या वाढीव हद्दीतील विकासकामे अधिकाऱ्यांच्या आदेशानेच होत आहेत अगदी निकृष्ट दर्जाचे

नवनिर्माण फाऊंडेशनचे अध्यक्ष अनुप ठाकरे यांचा आरोप

मुख्याधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून कामाची चौकशी होईपर्यंत देयक अदा न करण्याची मागणी

लोकप्रतिनिधीचे हेतुपुरस्पर दुर्लक्ष 

कारंजा दि. 18 (www.jantaparishad.com) - मागील काही वर्षांपूर्वी कारंजा तालुक्यातील चार ग्राम पंचायतीचा काही भाग हद्दवाढीमुळे कारंजा न. प. मध्ये समाविष्ट झाला. सदर भागात कुठल्याही प्रकारचे विकासकामे झालेली नसल्याने न.प. च्या वतीने सदर वाढीव हद्दीत रस्त्याचे,सिमेंट कॉक्रिटीकरण व सांडपाण्याच्या नालीचे बांधकाम अशी कामे सुरू करण्यात आली. सदर कामे अंदाजपत्रकानुसार होत नसून काही ठिकाणी तर अक्षरशः लोखंडी सळ्या वापरल्याच नसल्याने अंदाजपत्रकातं दर्शविण्यात आलेल्या निकषानुसार व मापदंडानुसार करण्यात न आल्याचा ठपका ठेवीत सदर काम न प अधिकाऱ्यांच्या आदेशाने  निकृष्ठ दर्जाचे केल्या जात असल्याचा आरोप नवनिर्माण फाऊंडेशनचे अध्यक्ष अनुप ठाकरे च्या वतीने मुख्याधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आला आहे. तसेच लोकप्रतीनिधी या कामाकडे हेतुपुरस्पर दुर्लक्ष करीत आहेत. तरी या कामाची चौकशी होईपर्यंत संबंधित कंत्राटदाराला देयक अदा करण्यात येऊ नये आणि दोषींवर कारवाई करण्यात यावी,अशी मागणी सुध्दा करण्यात आली आहे. 

नाली बांधकाम व कॉक्रिटीकरण या कामात वापरण्यात आलेली खनिज सामग्री अंदाजपत्रकानुसार वापरण्यात न आल्याचे देखील निवेदनात नमूद करण्यात आले आहे. शिवाय या कामात मोठ्या प्रमाणात आर्थिक भ्रष्टाचार झाल्याचे कामाच्या गुणवत्तेवरून निदर्शनास येत असल्याने दोषींवर कारवाईची मागणी  अनुप ठाकरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांसह मुख्यमंत्री यांना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे.

No comments

Powered by Blogger.