Header Ads

My Pad My Right Prakalp - "मासिक पाळी" विटंबना नसून वरदान - पुनम बंग

My Pad My Right Prakalp - "मासिक पाळी" विटंबना नसून वरदान - पुनम बंग


"मासिक पाळी" विटंबना नसून वरदान - पुनम बंग

माय पॅड माय राईट" प्रकल्पा अंतर्गत व्याख्यान,वर्ग 8 ते 10 वी च्या मुलिंची उपस्थिती

कारंजा दि. १९ - नाबार्ड कडून मिळालेल्या ध्यास युवती महीला बचत गटाला "माय पॅड माय राईट" या प्रकल्पा मधून सनेटरी पॅडच्या निर्मितीचा ध्यास बचत गट कारंजा शहर व तालुक्या मध्ये करीत आहे.त्याच अनुसंघाने दिनांक 18 डिसेम्बर रोजी यावर्डी येथिल  धाबेकर विद्यालय येथे आयोजित  केलेल्या  कार्यक्रमात ध्यास संस्थेच्या अध्यक्ष पुनम बंग मार्गदर्शन करतांना म्हणाल्या "मासिक पाळी" विटंबना नसून वरदान आहे.

आयोजित कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून शाळेचे मुख्याध्यापक विजय भड तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून ध्यास संस्थेचे अध्यक्ष पूनम बंग तर प्रमुख अतिथी म्हणून ध्यास संस्थेच्या सचिव रोशनी रेवाळे,पूनम कदम सुवर्णा वक्टे उपस्थित होते.

 कार्यक्रमाचे संचालन व प्रास्ताविक राजेश शेंडेकर यांनी केले. त्यानंतर प्रमुख मार्गदर्शक पुनम बंग यांनी मासिक पाळी या विषयावर बोलताना विद्यालयातील विद्यार्थ्यांनी ना सांगितले की मासिक पाळी ही विटंबना नसून ती एक वरदान आहे. ज्या प्रमाणे एका स्त्रीला जर मासिक पाळी आली नाही तर कुटुंब तिला स्वीकारत नाही. मग जी गोष्ट आपल्याला एका स्त्रीच अस्तित्व प्रदान करते तर ती विटंबना होऊच शकत नाही.मासिक पाळी बद्दल घरातील पुरुषानं पासून आपण बऱ्याच गोष्टी लपवितो परंतु त्यांच्या आयुष्यात एक तरी स्त्री असते. मग त्यांच्या पासून लपवल्या पेक्षा होनाऱ्या त्रासाची माहिती त्यांना देणं हे आपले कर्तव्य आहे व याच सोबत मासिक पाळीत वापरल्या जाणाऱ्या वस्तूची योग्य विल्हेवाट कशी लावावी? याबद्दल मार्गदर्शन करण्यात आले. तसेच ध्यास बचत गटाच्या माध्यमातून निर्मित पॅड फ्री मध्ये विद्यार्थिनींना देण्यात  आले. अध्यक्ष भाषणात शाळेचे मुख्याध्यापक विजय भड यांनी ध्यास संस्थेने जो उपक्रम हाती घेतला तो किती आवश्यक आहे? याचे महत्त्व विद्यार्थ्यांना पाठवून दिले तसेच ध्यास संस्थेच्या चमूचे अभिनंदन केले.

विद्यालयातील विद्यार्थ्यांनी अतिशय उत्साहाने कार्यक्रमाला उपस्थित दर्शविली व ध्यास संस्थेच्या अध्यक्ष पुनम बंग व संपूर्ण टीमचे कु.वेदिका करडे या विद्यार्थिनीने आभार मानले.

No comments

Powered by Blogger.