Header Ads

No intermediary to get the benefits of swadhar and scholarship - स्वाधार व शिष्यवृत्ती योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी कोणीही मध्यस्थ नाही

No intermediary to get the benefits of swadhar and scholarship


स्वाधार व शिष्यवृत्ती योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी कोणीही मध्यस्थ नाही

कोणाही त्रयस्थाच्या भूलथापांना बळी पडू नये : समाज कल्याण विभागाची माहिती

वाशिम, दि. 18 (जिमाका / www.jantaparishad.com) :  सामाजिक न्याय विभागाच्या शासकीय वसतीगृहात प्रवेश घेण्यास पात्र असलेल्या परंतु शासकीय वसतीगृहात प्रवेश न मिळालेल्या / शासकीय वसतीगृहात प्रवेश न घेतलेल्या अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील विद्यार्थ्यांना स्वाधार योजनेअंतर्गत रक्कम त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यावर शासन निर्णयानुसार थेट वितरीत करण्यात येते.

समाज कल्याण कार्यालयास स्वाधार योजनेअंतर्गत प्राप्त अर्जाचे अनुषंगाने प्राधान्यक्रमाने पात्र ठरत असलेल्या विद्यार्थ्यांना लाभाची रक्कम त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येते. स्वाधार योजनेअंतर्गत प्रत्यक्ष विद्यार्थ्यांकडूनच अर्ज स्वीकारले जातात. पात्र अपात्र व त्रुटीमधील विद्यार्थ्यांची यादी कार्यालयामध्ये विद्यार्थ्यांना उपलब्ध करुन देण्यात येते. त्याचप्रमाणे पात्र विद्यार्थ्यांची यादी विद्यार्थी प्रवेशित असलेल्या महाविद्यालयांनासुध्दा उपलब्ध करुन देण्यात येते. त्यामुळे अर्ज सादर केलेल्या विद्यार्थ्यांना आपल्या अर्जाबाबतची माहिती कार्यालयाकडून वेळीच उपलब्ध करुन देण्यात येते.

सन 2021-22 मधील पात्र विद्यार्थ्यांचा दुसरा हप्ता रक्कम प्राप्त अर्ज 328 त्यापैकी 324 अर्ज पात्र, पात्र प्रलंबित अर्ज 4 असून प्रत्यक्ष लाभ दिलेले विद्यार्थी 324 आहे. प्रत्यक्ष लाभ दिलेली रक्कम 59 लख 94 हजार रुपये असा दुसऱ्या हप्त्याचा लाभ देण्यात आला आहे.   

सन 2022-23 मध्ये मागील वर्षातील नुतनीकरणास प्राप्त अर्ज 761 असून त्यापैकी पात्र अर्ज 635 आहे. पात्र प्रलंबित अर्ज 12 असून, प्रत्यक्ष लाभ दिलेल्या विद्यार्थ्यांची संख्या 727 आहे. या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष 1 कोटी 17 लक्ष 47 हजार 500 रुपये रक्कमेचा पहिला हप्ता रक्कमेचा लाभ देण्यात आला आहे.   

सन 2022-23 मधील नवीन प्राप्त अर्ज 1264 आहे. त्यापैकी 798 अर्ज पात्र आहे. पात्र प्रलंबित अर्ज 45 आहे. प्रत्यक्ष लाभ दिलेले विद्यार्थी 753 असून या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष लाभ 57 लक्ष 56 हजार 307 रुपये रक्कमेचा पहिला हप्ता देण्यात आला आहे.

शैक्षणिक सत्र 2019 -20 ते सन 2021-22 या शैक्षणिक वर्षातील निधी अभावी प्रलंबित विद्यार्थ्यांना प्राधान्यक्रमाने सन 2022-23 आणि 2023-24 या आर्थीक वर्षात प्राधान्यक्रमाने लाभ देण्यात आलेला आहे.

त्याचप्रमाणे सन 2022 -23 मधील पात्र विद्यार्थ्यांना प्राप्त निधीमधून समप्रमाणात निधी वितरीत करण्यात आला आहे.

वरील तपशीलाप्रमाणे सद्यस्थितीत सन 2022-23 मधील पात्र विद्यार्थ्यांना प्रलंबित दुसरा हप्त्याची रक्कम मिळण्याकरिता वरीष्ठ कार्यालयास 422 लक्ष रुपये निधीची मागणी करण्यात आली आहे. निधी प्राप्त होताच प्राधान्यक्रमाने पात्र विद्यार्थ्यांचे बँक खात्यात लाभाची रक्कम जमा करण्यात येईल.

त्याचप्रमाणे मॅट्रीकोत्तर भारत सरकार शिष्यवृत्ती योजना ही महाडीबीटी ऑनलाईन पोर्टलव्दारे राबविली जात आहे. विद्यार्थ्यांना योजनेचे लाभ समाज कल्याण आयुक्तालय, पुणे यांचे स्तरावरून ऑनलाईन पध्दतीने देण्यात येतो.

मॅट्रीकोत्तर भारत सरकार शिष्यवृत्ती योजनेपासून कोणताही मागासवर्गीय विद्यार्थी वंचीत राहु नये याकरिता कार्यालयाकडून वेळोवेळी जिल्हयातील सर्व महाविद्यालय व विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे अर्ज भरण्याचे आवाहन करण्यात येते.

समाज कल्याण विभागातील स्वाधार योजना व इतर योजनांचे अनुषंगाने लाभ मिळवून देण्याचे आमीष दलालांचे प्रलोभनास लाभार्थी विद्यार्थ्यांनी बळी न पडता योजनांचा लाभ घेण्याकरिता रितसर अर्ज / प्रस्ताव कार्यालयास सादर करुन अर्ज पात्र / अपात्रतेबाबत लाभार्थ्यांनी स्वतः कार्यालयात कार्यालयीन वेळेत चौकशी करण्यात यावी. जर कोणी मध्यस्थी दलाल अर्ज पात्र करुन देण्याबाबतचे प्रलोभन देत असेल अशा व्यक्तीची रितसर तक्रार कार्यालयास करण्यात यावी. असे आवाहन समाज कल्याणचे सहायक आयुक्त मारोती वाठ यांनी केले आहे.

No comments

Powered by Blogger.