Header Ads

राज्यातील लॉकडाऊनच्या कालावधीत ३१ मे पर्यंत वाढ

राज्यातील लॉकडाऊनच्या कालावधीत ३१ मे पर्यंत वाढ

यापूर्वी काढण्यात आलेले सर्व आदेश ३१ मे पर्यंत लागू 


  मुंबई (महासंवाद द्वारा) दि. १७ – राज्यात कोविड-१९ विषाणूचा प्रादूर्भाव वाढत असल्याने शासनाने प्रतिबंधात्मक अत्यावश्यक उपाययोजना करण्यासाठी राज्यातील लॉकडाऊनच्या कालावधीत ३१ मे २०२० पर्यंत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. साथरोग कायदा १८९७ तसेच आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ अंतर्गत शासनास असलेल्या अधिकारांचा वापर करून राज्याच्या कार्यकारी समितीचे अध्यक्ष तथा मुख्य सचिव अजोय मेहता यांनी हे आदेश जारी केले आहेत.
     यापूर्वी वेळोवेळी जारी करण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांची शासनाच्या सर्व विभागांनी या कालावधीत काटेकोर अंमलबजावणी करावी. तसेच यापूर्वी काढण्यात आलेले सर्व आदेश ३१ मे पर्यंत लागू राहतील, असे निर्देश मुख्य सचिवांनी दिले आहेत. विभागनिहाय सूट किंवा लॉकडाऊन उठविण्यासंदर्भात योग्य त्या सूचना वेळोवेळी दिल्या जातील, असेही त्यांनी या आदेशात म्हटले आहे.
     यापूर्वी दि. २ मे २०२० रोजीच्या आदेशानुसार राज्यात १७ मे २०२० पर्यंत लॉकडाऊन वाढविण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. तसेच त्यात गरजेनुसार वेळोवेळी मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या होत्या.




No comments

Powered by Blogger.