Header Ads

वाशिम जिल्ह्याचे अकरा पैकी प्राप्त चारही रिपोर्ट निगेटिव्ह

वाशिम जिल्ह्याचे अकरा पैकी प्राप्त चारही रिपोर्ट निगेटिव्ह 

दोघांना सारीचे लक्षणे तर दोन ILI चे रुग्ण

रेड झोन मधून आलेल्यांनी कॉरंटाईन राहावे : काळजी घ्या : अंतर राखा 

आज शेजारील जिल्ह्यातील अकोला येथे ३२ तर हिंगोलीत ८ पॉझिटिव्ह 



कारंजा (जनता परिषद) दि.१७ - आज दिनांक १७ मे रविवार रोजी दुपारचे सत्रात वाशिम जिल्ह्यातील अप्राप्त असलेल्या ११ पैकी ४ अहवाल अकोला प्रयोगशाळेने दिले असून चारही निगेटिव्ह आले आहेत, अशी माहिती जिल्हा माहिती कार्यालय द्वारा देण्यात आलेली आहे. 
शुक्रवार दिनांक १५ मे रोजी पाठविण्यात आलेल्या ५ पैकी हे ४ रिपोर्ट असून यांतील ३ व्यक्तींना सारीचे लक्षण तर १ व्यक्ती हा ILI (Influenza-like illness) एका प्रकारचा तापच असल्याची लक्षणे असलेली आहे. यांतील सारीचे २ रुग्णांवर कारंजा उपजिल्हा रुग्णालय येथे उपचार सुरु आहे. तर उर्वरित २ रुग्णांवर जिल्हा सामान्य रुग्णालय वाशिम येथे उपचार सुरु आहेत. 
मालेगांव येथे येत असलेले कुटुंबीयांचे काल दि.१६ मे शनीवार रोजी पाठविलेलेे ६ व १५ मे चे १ असे एकुण ७ थ्रोट स्वॅबचे अहवाल येणे बाकी आहे. 
आजमितीला गृह विलगीकरणात ४१, संस्थात्मक विलगीकरणात १७ तर अलगीकरणात (Isolation) ८ व्यक्ती आहेत. 

रेड झोन मधून आलेल्यांनी कॉरंटाईन राहावे : काळजी घ्या : अंतर राखा आज शेजारील जिल्ह्यातील अकोला ३२ तर हिंगोलीत ८ पॉझिटिव्ह 

वाशिम जिल्ह्याचे शेजारील जिल्ह्यांमध्ये कोरोना हा वाढतच आहे, यामुळे नागरिकांनी सतर्क राहणे गरजेचे आहे. रेड झोन मधून वाशिम जिल्ह्यात, शहरात अथवा खेड्यापाड्यांमध्ये आलेल्या नागरिकांनी आपले कर्तव्य म्हणून व आपले परिवार, बंधूबांधव, मित्रमंडळी, शेजारी तसेच गावाचे नागरिकांचे आरोग्य अबाधीत राहावे म्हणून विलगीकरणात राहणे गरजेचे आहे. ज्यांचे हातावर गृह विलगीकरणाचा शिक्का आहे, त्या त्या व्यक्तींनी घराबाहेरच नव्हे तर आपल्या रुम अथवा घरातील विशिष्ट भागाचे बाहेरच निघू नये असे आवाहन प्रशासनासह आता संपुर्ण जनताही करीत आहे. 
आपले शेजारील सिमा लागून असलेले जिल्ह्यातील अकोला येथे आज सकाळी ३२ तर हिंगोली येथे ८ व्यक्ती हे कोरोना पॉझिटिव्ह आढळून आलेले आहेत. प्राप्त माहिती नुसार हिंगोली जिल्ह्यातील बसमत तालुक्यात आढळलेले आठही पॉझिटिव्ह हे रेड झोन असलेले मुंबई पुणे या भागातून आले असल्याचे कळते. 
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

Washim District: Four reports received today out of eleven: All negative

Both have symptoms of Sari and two have ILI

Those coming from the red zone should stay quarantined: Be careful: Keep a distance
Today 32 in Akola and 8 in Hingoli in the neighboring district are positive

     Karanja (Janata Parishad) 17th - In the afternoon session on Sunday 17th May, 4 out of 11 unrecorded reports from Washim district were given by Akola laboratory and all the 4 were negative, according to the District Information Office.
     Out of the 5 reports sent on Friday, May 15, 4 reports show that 3 of them have symptoms of sari and 1 person has symptoms of ILI (Influenza-like illness). Two of these patients are undergoing treatment at Karanja Sub-District Hospital. The remaining 2 patients are undergoing treatment at District General Hospital, Washim.
     Reports of a total of 7 throat swabs are yet to be received. 6 from the family coming to Malegaon on Saturday 16th May and 1 of May 15th.
     Today, there are 41 people in-home quarantine, 17 in institutional quarantine, and 8 in isolation.

Those coming from the red zone should stay quarantined: be careful: keep a distanceToday, 32 in Akola and 8 in Hingoli in the neighboring district are positive

     Corona is on the rise in neighboring districts of Washim district, so citizens need to be vigilant. Citizens coming from Red Zone to Washim district, city or village have to live in segregation as per their duty and to maintain the health of their family, brothers, friends, neighbors as well as the citizens of the village. The entire public, including the administration, is now appealing to those who have the seal of home quarantine in their hands, not to go out of the house but even not out of their room or a specific part of the house.
     Thirty-two corona-positive people were found in Akola and eight in Hingoli in the neighboring district this morning. According to the information received, all the eight positives found in Basmat taluka of the Hingoli district came from the red zone area Mumbai Pune. 

No comments

Powered by Blogger.