Header Ads

लॉकडाऊन ४.० : वाशिम जिल्हाधिकार्‍यांनी जारी केले दिशा निर्देश

लॉकडाऊन ४.० : वाशिम जिल्हाधिकार्‍यांनी जारी केले दिशा निर्देश 

यापुर्वी परवानगी दिलेली दुकाने आस्थापना सुरु राहणार 

हि दुकाने बंद राहणार : केश कर्तनालय, ब्युटी पार्लर, चहा टपरी, पानटपरी, उपहारगृह, ढाबे 

आस्थापना, दुकानातील कर्मचाऱ्यांच्या पासला ३१ मेपर्यंत मुदतवाढ


कारंजा (जनता परिषद) दि.१७ - राज्य शासनाने निर्देशीत केले प्रमाणे राज्यात लॉकडाऊन ४.० हे आता उद्या दिनांक १८ मे पासून ३१ मे पर्यंत वाढविण्यात आले आहे. या अनुषंगाने वाशिमचे जिल्हाधिकारी श्री. हृषीकेश मोडक यांनी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, वाशिम चे पदसिद्ध अध्यक्ष या अधिकाराने वाशिम जिल्ह्यासाठी विशेष आदेश काढले आहेत.
याबाबत कोणत्याही प्रकारचे उल्लंघन झाल्यास संबंधीतांचे विरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येईल. भाग-१ मधील तरतुदी वगळता इतर सर्व तरतुदी कॉन्टेंन्मेंट झोन साठी लागू असणार नाहीत. भविष्यात जिल्ह्यात कोठेही कोव्हीड-१९ चा रुग्न आढळून आल्यास अशा ठिकाणी कोन्टेंन्मेंट झोन घोषीत करण्यात येईल व भाग एक मधील तरतुदी वगळता दिलेल्या सर्व तरतुदी रद्द करण्यात येतील, असे निर्देश दिले आहेत.
-----------------------------------------------------------------------------------------------------
खालील प्रमाणे निर्देश आहेत भाग -१
१) सुरक्षेच्या उद्ेशाशिवाय रेल्वेने सर्व प्रकारच्या प्रवाशी वाहतूकीवर बंधने राहतील, कोणत्याही रेल्वेने प्रवाशांची वाहतूक करता येणार नाही.
२) अधिकृत परवानगी शिवाय परराज्यातून वाशिम जिल्ह्यात व जिल्ह्यातून परराज्यात प्रवासाला पूर्णत: बंदी
३) खाजगी प्रवासी वाहतूकीची सर्व साधने रिक्षा सह बसेस बंद राहतील. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे बसेस जिल्ह्यांतर्गत दिलेल्या वेळेत सुरु राहतील.
४) शाळा, कॉलेज, शैक्षणीक संस्थान, प्रशिक्षण संस्था, कोचींग क्लासेस पुर्णपणे बंद राहतील.
५) आरोग्य, गृह व इतर शासकीय अधिकारी कर्मचारी सोडून इतरांसाठी आदरातिथ्य सेवा पूर्णपणे बंद राहील. सदरचा मुद्दा अडकलेल्या व्यक्तींसाठी/प्रवाशांसाठी/पर्यटकांसाठी लागू राहणार नाही.
६) सर्व चित्रपटगृहे, जिम, मॉल, स्पोर्टस क्लब, स्विमींग पुल, बार, असेंबली हॉल पूर्णपणे बंद राहतील.
७) सर्व सामाजीक/राजकीय/क्रिडा/सास्कृतीक/धार्मीक कार्यक्रमांवर बंदी राहील.
८) सर्व धार्मीक स्थळे, प्रार्थना स्थळे बंद राहतील. कोणत्याही परिस्थितीत धार्मीक सभा. परिषद, मेळावे भरविता येणार नाही.
९) केश कर्तनालये, ब्युटी पार्लर, चहा  टपरी, पानटपरी, उपहारगृह, ढाबे पुर्णपणे बंद राहतील.
१०) दारु दुकाने सुरु करण्याबाबत जिल्हाधिकारी व राज्य उत्पादन शुल्क, वाशिम यांनी दिनांक ०५ मे रोजी निर्गमीत केलेले आदेश यापुढेही कायम राहील.
-----------------------------------------------------------------------------------------------------
खालील प्रमाणे निर्देश आहेत भाग -२
दुकाने/आस्थापना सोशियल डिसटेंसींग चे पालन करुन उघडण्यास मान्यता राहील. मास्क, वैयक्तीक स्वच्छता, सॅनिटायझरचा वापर बंधनकारक. दुकानासमोर सहा फुटाचे अंतरावर मार्कींग दुकानदारास करावे लागेल. दुकानात एकावेळी ५ पेक्षा जास्त इसम असता कामा नये.
१) सर्व प्रकारची दुकाने/आस्थापना, पेट्रोल पंप सकाळी ८.०० ते दुपारी २.०० पर्यंत सुरु राहतील. कृषी व कृषी संबंधीत मालाच्या वाहतूकीसाठी डिझेल इंधनाचा पुरवठा आवश्यक असल्याने केत्तळ या बाबीसाठी सकाळी ६.०० ते सायंकाळी ६.०० या कालावधीत डिझेल इंधन उपलब्ध करुन देण्यास हरकत नाही.
सर्व प्रकारचे दुकाने व आस्थापनांच्या कर्मचार्‍यांसाठी पासेस बंधनकारक राहतील. वाशिम शहरासाठी हे पासेस जिल्हाधिकारी कार्यालय तर इतर जागांवर तहसीलदार ह्या पासेस निर्गमीत करतील, याबाबतचे अधिकारी तहसिलदार यांना देण्यात आलेले आहे.
२) एमआयडीसी भागात उद्योगधंदे सकाळी ७.०० ते रात्री ७.०० या वेळेत सुरु राहतील. येथे काम करणार्‍या कर्मचार्‍यांना वर प्रमाणेच पास बंधनकारक राहील.
३) कोणत्याही इतर वस्तुंसाठी व सेवांसाठी ऑनलाईन सुविधा चा वापर करता येऊ शकेल. सकाळी ७.०० ते रात्री ७.०० अशी यासाठीची वेळ राहील. यासाठी सुद्धा पासेस बंधकारक राहतील.
४) कृषी उत्पन्न बाजार समिती, कृषी सेवा केंद्र, गॅस एजंसी, इमारतींची बांधकामे सकाळी ८.०० ते सायकंाळी ६.०० अशा वेळेत सुरु राहतील. इमारतीच्या बांधकामासाठी असणार्‍या मजूरांना व ठेकेदाराला पासेस काढणे बंधनकारक आहे.
वरील प्रमाणे क्रमांक १,२,३ व ४ साठी याआधी विविध आस्थापना व सेवांसाठी देण्यात आलेल्या पासेस दिनांक ३१ मे २०२० पर्यंत वैध राहतील.
५) सर्व बँका सकाळी ८.०० ते दुपारी २.०० या वेळेत सुरु राहतील.
६) अंत्यविधीसाठी जास्तीत जास्त २० लोकांना परवानगी राहील. यांत सोशियल डिस्टंसींग, मास्क चा वापर इत्यादी पाळण्यात यावा.
वैद्यकीय सेवा (मेडीकल धरुन) २४ तास सुरु राहतील. सर्व शासकीय निमशासकीय व बँक कर्मचार्‍यानंा आरोग्य सेतू ऍप डाऊनलोड करण्याचे बंधनकारक करण्यात आले आहे.
अशा प्रकारचे आदेश वाशिमचे जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांनी आज रोजी जारी केले आहे.

No comments

Powered by Blogger.