Header Ads

जिल्ह्यात १५ ऑक्टोबर पासून कापूस खरेदी केंद्र सुरू होणार - Cotton procurement center to open in the district from October 15

जिल्ह्यात १५ ऑक्टोबर पासून कापूस खरेदी केंद्र सुरू होणार - Cotton procurement center to open in the district from October 15


जिल्ह्यात १५ ऑक्टोबर पासून कापूस खरेदी केंद्र सुरू होणार 

३० सप्टेंबरपर्यंत ‘कपास किसान’ अॅपद्वारे शेतकऱ्यांची नोंदणी बंधनकारक

वाशिम,दि.17 सप्टेंबर (जिमाका) हंगाम सन २०२५-२६ मध्ये भारतीय कपास महामंडळ (सी.सी.आय.) मार्फत किमान आधारभूत किंमतीवर (एमएसपी) कापूस खरेदीस प्रारंभ होणार असून यासाठी शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणी आवश्यक आहे.

जिल्ह्यात अनसिंग (ता. वाशिम), मंगरुळपीर, कारंजा लाड व मानोरा या चार खरेदी केंद्रांवर १५ ऑक्टोबर २०२५ पासून खरेदी सुरू होईल. यासाठी शेतकऱ्यांनी ‘कपास किसान’ मोबाईल अॅप द्वारे नोंदणी करणे बंधनकारक असून नोंदणीची अंतिम मुदत ३० सप्टेंबर २०२५ आहे.

नोंदणी कालावधी १ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर २०२५ असून प्रक्रिया अगदी सोपी ठेवण्यात आली आहे :

1. ‘कपास किसान’ अॅप डाउनलोड करणे.

2. आवश्यक कागदपत्रे तयार ठेवणे –

  • जमीन नोंदणी (२०२५-२६ चे ऑनलाईन अद्ययावत),
  • महसूल प्राधिकरणाची प्रमाणित पिक लागवड नोंद (२०२५-२६ अद्ययावत),
  • वैध आधार कार्ड,
  • पासपोर्ट साईज फोटो.

शेतकऱ्यांनी दिलेल्या कालावधीत स्व-नोंदणी पूर्ण करून एमएसपी योजनेचा लाभ घ्यावा, असे भारतीय कपास महामंडळ (सीसीआय) व जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, वाशिम यांच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.

कोई टिप्पणी नहीं

Blogger द्वारा संचालित.