योगेश कुंभेजकर यांनी जिल्हाधिकारी पदाची सूत्रे स्वीकारली - Yogesh Kumbhejkar Washim District Collector took the charge
योगेश कुंभेजकर यांनी जिल्हाधिकारी पदाची सूत्रे स्वीकारली
Yogesh Kumbhejkar Washim District Collector took the charge
वाशिम, दि. २१ ऑगस्ट (जिमाका/www.jantaparishad.com) - जिल्ह्याचे नवीन जिल्हाधिकारी म्हणून योगेश कुंभेजकर (Yogesh Kumbhejkar Washim District Collector took the charge) यांनी आज २१ ऑगस्ट रोजी पदाची सूत्रे स्वीकारली. यावेळी अपर जिल्हाधिकारी ब्रिजेश पाटील आणि निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे यांनी त्यांचे स्वागत केले.
श्रीमती बुवनेश्वरी एस. यांची राज्य शासनाने अकोला येथे महाबीजच्या व्यवस्थापकीय संचालकपदी बदली केली आहे. त्यांच्या जागी वाशिम जिल्ह्याचे नवे जिल्हाधिकारी म्हणून योगेश कुंभेजकर यांची नियुक्ती करण्यात आली. यासंदर्भातील आदेश सामान्य प्रशासन विभागाने २० ऑगस्ट रोजी जारी केले होते.
नुतन जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर हे २०१६ बॅचचे आयएएस अधिकारी असून, त्यांनी यापूर्वी भंडारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तसेच नागपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून यशस्वी कामकाज पाहिले आहे. वाशिम येथे रुजू होण्यापूर्वी ते महाबीजचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून कार्यरत होते.
Post a Comment