उद्या कारंजा येथे सायकल मॅरेथॉन रॅलीचे आयोजन - cycle marathon rally in Karanja by Karanja Police
कारंजा शहर पोलीस स्टेशन चे वतीने
उद्या सायकल मॅरेथॉन रॅलीचे आयोजन
कारंजा दि.२२ (www.jantaparishad.com) - पोलीस स्टेशन कारंजा शहर अंतर्गत उद्या दिनांक 23/08/2025 रोजी मा पोलीस अधिक्षक साहेब वाशिम यांचे संकल्पणेतुन फिट इंडीया मिशन अर्तगत सायकल मॅरेथॉन रॅलीचे (cycle marathon rally in Karanja) आयोजन करण्यात आलेले आहे.
तरी कारंजा शहर येथील इच्छुक महिला, पुरुष, विद्यार्थी, विद्यार्थिनी यांनी जास्तीत जास्त संख्येने आप आपले सायकलीसह ट्रकसुट/पीटी ड्रेस सह झांसी राणी चौक क्रिडा संकुल कारंजा येथे दिनांक 23/08/2025 चे सकाळी 06/30 वाजता हजर रहावे असे आवाहन मा उपविभागीय पोलीस अधिकारी श्री पाडवी साहेब कारंजा तसेच पोलीस निरीक्षक श्री शुक्ला साहेब पो स्टे कारंजा शहर यांनी केली आहे. तरी सहभागी सायकल स्वार यांना पोलीस स्टेशन तर्फे टी-शर्ट व कॅप वाटप करण्यात येणार आहे.
Post a Comment