Header Ads

२५ व २६ एप्रिल रोजी मतदान केंद्र परिसरात १४४ लागू - 144 applicable in polling station area on 25th and 26th April

२५ व २६ एप्रिल रोजी मतदान केंद्र परिसरात १४४ लागू - 144 applicable in polling station area on 25th and 26th April


लोकसभा सार्वत्रिक निवडणूक

२५ व २६ एप्रिल रोजी मतदान केंद्र परिसरात १४४ लागू

      वाशिम, दि. 6 (जिमाका / www.jantaparishad.com) : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ करीता २६ एप्रिल रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. मतदानाच्या दिवशी लोक राजकीय कारणावरुन विनाकारण भांडण तंटे करतात, त्याचे रुपांतर मोठया भांडणात किंवा घटनेत होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची दाट शक्यता असते. या सर्व बाबींना प्रतिबंध घालण्यासाठी व निवडणूक प्रक्रीयेदरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधीत राखण्याच्या उद्देशाने निवडणूकीची संपूर्ण प्रक्रिया शांततेत निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टिकोणातून निवडणूकीदरम्यान कायदा व सुव्यवस्था राखण्याकरीता संबंधित मतदान केंद्र परिसरात २५ एप्रिल रोजी सकाळी ६ ते २६ एप्रिल रोजीच्या सायंकाळी ६ वाजेपर्यंत फौजदारी दंड प्रक्रीया संहिता १९७३ चे कलम १४४ अन्वये प्रतिबंधात्मक आदेश जिल्हादंडाधिकारी बुवनेश्वरी एस. यांनी लागू केले आहे.

             हे आदेश वरील कालावधीत लागू राहणार असल्यामुळे २४ एप्रिल रोजी सायं ६  वाजतानंतर राजकीय पक्षांना प्रचार सभा घेता येणार नाही. निवडणूकीच्या संबंधाने धार्मिक स्थळांचा उपयोग करता येणार नाही. आचार संहितेच्या संपूर्ण काळात सार्वजनिक ठिकाणी शस्त्र जवळ बाळगता येणार नाही. मतदानाच्या दिवशी मतदान केंद्राच्या ठिकाणी १०० मीटर परिसरात निवडणूकीच्या कामाव्यतिरिक्त कोणत्याही व्यक्तीला प्रवेश करता येणार नाही. 

No comments

Powered by Blogger.