Header Ads

त्यागमूर्ती माता रमाई भिमराव आंबेडकर यांची जयंती कारंजा येथे उत्साहात साजरी - mata ramai bhimrao ambedkar jayanti in karanja

त्यागमूर्ती माता रमाई भिमराव आंबेडकर यांची जयंती कारंजा येथे उत्साहात साजरी - mata ramai bhimrao ambedkar jayanti in karanja


त्यागमूर्ती माता रमाई भिमराव आंबेडकर यांची जयंती कारंजा येथे उत्साहात साजरी

मातोश्री रमाबाई आंबेडकर कॉलनी येथील बुद्ध विहारात कार्यक्रम संपन्न 

कारंजा दि. ८ - वंचित बहूजन महिला आघाडी तथा भारतीय बौद्ध महासभा,समता सैनिक दल (मुंबई)  शाखा कारंजा (लाड) ता.कारंजा (लाड) जि. वाशिम यांच्या संयुक्त विद्यमाने दि.०७/०२/२०२४ रोजी बुद्ध विहार परिसर मातोश्री रमाबाई आंबेडकर कॉलनी, कारंजा (लाड), जि.वाशिम येथे त्यागमुर्ती माता रमाई आंबेडकर यांची जयंती उत्साह साजरी करण्यात आली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वंचित बहूजन महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षा तथा माजी नगराध्यक्ष मंगरूळपीर डॉ.गजाला मारूफ खान यांची उपस्थितीत तर वंचित बहूजन महिला आघाडीच्या जिल्हा अध्यक्षा सौ.ज्योतीताई इंगळे,महिला आघाडी जिल्हा महासचिव सौ.प्रतिभाताई अंभोरे, मा,सौ.सुशिलाताई खाडे, जिल्हा उपाध्यक्षा सौ.मेघाताई डोंगरे, प्रा.डॉ.राधाताई पवार, कौशल्या ताई बेलखेडे या सर्व मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती माता रमाई आंबेडकर जयंती असा साजरी करण्यात आली. सर्व मान्यवरांनी बहुसंख्येने उपस्थित उपासक, उपासीकांना संबोधित करून माता रमाई आंबेडकर यांच्या संघर्षमय जिवन चारित्र्यावर सखोल मार्गदर्शन करीत असताना उपस्तिथ जनसमुहाला मंत्रमुग्ध केले व येना-या पुढील वर्षी वंचित बहूजन महिला आघाडीच्या वतीने मातोश्री रमाई आंबेडकर जयंती या पेक्षाही मोठया प्रमाणात साजरी करण्याचा संकल्प महिला आघाडीच्या वतीने करण्यात आला.

कार्यक्रमाला माता रमाईच्या लेकी सौ.प्रतिभा मडामे जिल्हा उपाध्यक्ष महिला आघाडी,तालुका अध्यक्षा सौ.छायाताई मोटघरे,शहर अध्यक्षा सौ.सिमाताई जगताप, सुप्रसिद्ध गायिका वंदना खोब्रागडे, भारतीय बौद्ध माहासभेच्या केंद्रीय शिक्षिका सौ.मेघाताई राऊत, सौ.शिला राऊत,सौ.अंजनाताई इंगोले,मिना बेलखेडे,समता सैनिक दल सौ.प्रज्ञा मेश्राम,सौ.माया अघमे, सौ.प्रतिभा प्रविन मडामे, वंचित बहूजन महिला आघाडीच्या पदमावती ढोके, माधूरी इंगळे,शेषकन्या पांडे,नम्रता ऊके, छाया घोडेस्वर,वानखडे ताई,वर्षाताई तायडे,शोभा चक्रे, शितल बोरकर, सविता आठवले, रूपाली सावळे, निता डोंगरे,शालू बांबोर्डे, शिला चक्रे बेबिबाई बोरकर,ताई खंडारे,तसेच वंचित बहूजन आघाडी तालुका अध्यक्ष नागेश पाटील,जिल्हा उपाध्यक्ष प्रा मुकुंद खडसे,तालुका उपाध्यक्ष गोरखनाथ वानखडे,भारतीय बौद्ध महासभेचे तालुका अध्यक्ष हर्षल इंगोले,समता सैनिक दलाचे गजानन भगत, यांच्यासह मान्यवरांचे प्रमुख उपस्तिथित मातोश्री रमाई आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली.

कार्यक्रमाचे यशस्वी ते करिता वंचित बहूजन आघाडी, वंचित बहूजन महिला आघाडी, भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दलाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ता यांनी आता परिश्रम घेतले व कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला.

आयोजकांच्या वतीने उपस्तिथित सर्व नेते प्रमुख मान्यवर उपस्थित उपासक उपासिका व नागरिकांचे मनापासून आभार मानले.

No comments

Powered by Blogger.