Header Ads

State level minigolf sports - Yavardi winner - राज्यस्तरिय मिनिगोल्फ स्पर्धेत यावर्डीचा प्रथम क्रमांक

State level minigolf sports - Yavardi winner  - राज्यस्तरिय मिनिगोल्फ स्पर्धेत यावर्डीचा प्रथम क्रमांक


यावर्डीच्या विद्यार्थिनींचा राज्यस्तरावर डंका

राज्यस्तरिय मिनिगोल्फ स्पर्धेत प्रथम क्रमांक

यशस्वी विद्यार्थिनींच्या चमूचे बस स्टैंड वर जोरदार स्वागत

८ मुलींना गोल्ड मेडल : वर्ल्ड मिनीगोल्फ स्पोर्ट फेडरेशन चे अध्यक्ष लिफ मैथिलबर्ग यांचे हस्ते मेडल व ट्राँफीचे वितरण

कारंजा दि ११ - राज्यस्तरीय शालेय मिनी गोल्फ स्पर्धा २०२३-२४ विभागीय क्रीडा संकुल मानकापूर,नागपूर येथे येथे दिनांक ०६ ते १० फेब्रुवारी दरम्यान आयोजित केली होती. त्यामध्ये बाबासाहेब धाबेकर माध्यमिक विद्यालय यावर्डी तालुका कारंजा जिल्हा वाशिम या शाळेच्या खेळाडूंनी खेळाचे उत्कृष्ट प्रदर्शन करून नेत्रादिपक कामगिरी बजावलेली आहे. मिनी गोल्फ या खेळामध्ये टीम इव्हेंट राज्यस्तरावर प्रथम क्रमांक प्राप्त केला त्यामुळे शाळेच्या एकूण आठ विद्यार्थीनी गोल्ड मेडल प्राप्त झाले.

कोल्हापूर विभाग, नाशिक विभाग व नागपूर विभाग यांच्यावर मात करत अतिशय चपळतेने प्रथम क्रमांक पटकावलेला आहे. सदर टीम मध्ये वर्ग 10 विच्या विद्यार्थिनी वेदिका करडे , जानवी पारे,  सृष्टी करडे, प्राची आडोळे, मुक्ता कापसे,  आरती बोनके , प्रशिका मानवटकर, आचल दिहाडे इत्यादि खेळाडू सहभागी होते. सदर विधार्थिनीना वर्ल्ड मिनीगोल्फ स्पोर्ट फेडरेशनचे अध्यक्ष लिफ मैथिलबर्ग यांचे हस्ते मेडल व ट्राँफीचे वितरण करण्यात आले.

यापूर्वी विद्यालयचे अनेक खेळाडू राज्यस्तरिय स्पर्धेत सहभागी झाले होते परंतु राज्यस्तरावर प्रथम क्रमांक पहिल्यांदा मिळाला आहे.त्यामुळे यशस्वी विद्यार्थ्यांचे काल रात्री 9:30 कारंजा बस स्टैंड वर आगमन होताच गटशिक्षणाधिरी श्रीकांत माने, विद्यालयाचे मुख्याध्यापक विजय भड, शिक्षक अनिल हजारे,गोपाल काकड यांनी जल्लोशात स्वागत करून सत्कार केला.

सर्व खेळाडूंचे व  शाळेचे क्रीडा शिक्षक प्रशिक्षक राजेश शेंडेकर यांचे, पालक वर्ग, संस्थाध्यक्ष योगेश खोपे, गटशिक्षणाधिकारी श्रीकांत माने,  मुख्याध्यापक विजय भड, शिक्षक वृंद गोपाल काकड, अनिल हजारे शिक्षकेत्तर कर्मचारी देविदास काळबांडे, हरिदास गंदरे,भालचंद्र कवाने,राजु लबडे,राजेश लिंगाटे, राजेंद्र उमाळे, तसेच कार्ली व यावर्डीचे गावकरी मंडळी यांनी  बस स्टँड कारंजा येथे पेढे वाटुन, हारार्पण करून व फटाके फोडून जल्लोशात स्वागत केले व पुढील वाटचाली करिता शुभेच्छा दिल्यात.

No comments

Powered by Blogger.