Header Ads

महाराष्ट्र बहुजन पत्रकार संघाच्या कारंजाची नुतनीकरण कार्यकारिणी गठित Maharashtra bahujan patrakar sangh karanja


महाराष्ट्र बहुजन पत्रकार संघाच्या कारंजाची नुतनीकरण कार्यकारिणी गठित Maharashtra bahujan patrakar sangh karanja


महाराष्ट्र बहुजन पत्रकार संघाच्या कारंजाची नुतनीकरण कार्यकारिणी गठित

तालुका अध्यक्षपदी आरीफ पोपटे याची फेरनिवड तर महेंद्र गुप्ता सचिवपदी

कारंजा (www.jantaparishad.com) दि.८ - महाराष्ट्र बहुजन पत्रकार संघाचे कार्यालयात संपन्न झालेल्या महत्वपूर्ण बैठकीत कारंजा तालुका कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.

बैठकीच्या अध्यक्ष स्थानी जिल्हा अध्यक्ष बंडू भाऊ इंगोले होते तर प्रमुख अतिथी म्हणून तालुका अध्यक्ष आरिफ पोपटे रामदास मिसाळ,सागर अंभोरे यांची उपस्थिती होती.

या बैठकीत तालुका कार्यकारणी चे नव्याने गठण करण्यात आले .तालुका अध्यक्ष म्हणून आरिफ पोपटे यांची फेर निवड करण्यात आली तर तालुका उपाध्यक्ष रामदास मिसाळ,प्रा डॉ रघुवंशी यांची निवड करण्यात आली.

 तालुका संघटक म्हणून के न्यूज चे प्रतिनिधी धनराज राठोड ,सह संघटक पोलिसनामां चे जिल्हा प्रतिनिधी कालूभाई तवगड,सचिव साप्ताहिक कारंजा अस्मिता चे संपादक महेंद्र गुप्ता,सहसचिव प्रबोधनी न्यूजच्या विभागीय प्रतिनिधी उषाताई नाईक , कोषा अध्यक्ष दैनिक वास्तव चे तालुका प्रतिनिधी दामोदर जोधलेकर , कार्यालयीन सचिव म्हणून महाराष्ट्र न्यूज  24 चे संपादक विनोद गणवीर यांनी तर प्रसिध्दी प्रमुख अपडेट इंडिया टी.व्ही. न्यूज चे जिल्हा प्रतिनिधी विजय खंडार,यांची सर्वानुमते निवड करण्यात आली .

यावेळी निवड करताना सूचक म्हणून गजानन टोपे यांनी प्रस्ताव मांडला तर या प्रस्तावाला अनुमती राजेश श्यामसुंदर यांनी दिली.बैठकीत पुढील वर्षभरात करावयाचे महाराष्ट्र बहुजन पत्रकार संघाचे कार्यक्रम पुस्तिकेनुसर होणाऱ्या कार्यक्रमावर चर्चा झाली. 

यावेळी बैठकीचे सूत्र संचालन महाराष्ट्र बहुजन पत्रकार संघाचे जिल्हा कार्यकारणी चे कोषाध्यक्ष विजय भडं यांनी प्रस्तावना केली तर आभार आरिफ पोपटे यांनी मानले .

No comments

Powered by Blogger.