Header Ads

Krushi Mahotsav at washim - ११ ते १५ फेब्रुवारी दरम्यान वाशिम येथे कृषी महोत्सव

Krushi Mahotsav at washim - ११ ते १५ फेब्रुवारी दरम्यान वाशिम येथे कृषी महोत्सव


११ ते १५ फेब्रुवारी दरम्यान वाशिम येथे कृषी महोत्सव

पालकमंत्री संजय राठोड करतील उद्घाटन 

वाशिम,दि.6 (www.jantaparshad.com / जिमाका) प्रकल्प संचालक आत्मा व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांचे संयुक्त विद्यमाने ११ ते १५ फेब्रुवारीपर्यंत स्व. बाळासाहेब ठाकरे कृषी संकुल प्रांगण,काटा रोड वाशिम येथे कृषी महोत्सवाचे आयोजन (Krushi Mahotsav at washim) करण्यात येणार आहे. या कृषी महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.खासदार, आमदार व लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहे.

            या कृषी महोत्सवामध्ये कृषी तंत्रज्ञानाची भव्य प्रदर्शनी,शेतकरी ते ग्राहक थेट शेतमाल विक्री, जिल्ह्यातील सेंद्रिय पीक उत्पादने, अन्नप्रक्रिया उत्पादनांची विक्री,कृषी व पूरक व्यवसाय आधारित परिसंवाद, शेतकरी,शास्त्रज्ञ,चर्चासत्रे,कृषी विभागाच्या सर्व योजनांची माहिती व मार्गदर्शन,पीएमएफएमई अंतर्गत लाभार्थी मार्गदर्शन,उद्योजक बनण्याची सुवर्णसंधी,विविध शासकीय विभागाची दालने,शेतकरी उत्पादक कंपनी व शेतकरी उत्पादक गटांचे स्टॉल,महिला गटांमार्फत खाद्य पदार्थांचे स्टॉल,अन्न निरंतर पौष्टिक तृणधान्य दालन,पौष्टिक तृणधान्य, सोया पदार्थ बनविण्याचे पाककृती प्रशिक्षण,आधुनिक कृषी अवजारे, सूक्ष्म सिंचन तंत्रज्ञान प्रात्यक्षिक व प्रदर्शन,विविध पीक,फळे भाजीपाला नमुने स्पर्धा,पुष्पस्पर्धा,पुष्प सजावट इत्यादी स्पर्धा तसेच सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.

         तरी जिल्ह्यातील सर्व शेतकरी, शालेय विद्यार्थी व जिल्हावासी यांनी सहभाग घ्यावा.असे आवाहन आत्मा, प्रकल्प संचालक अनिसा महाबळे यांनी केले आहे.

No comments

Powered by Blogger.