Header Ads

Washim Placement Drive on 8th Feb - ८ फेब्रुवारी रोजी रोजगार मेळावा

Washim Placement Drive on 8th Feb - ८ फेब्रुवारी रोजी रोजगार मेळावा


वाशिम जिल्हयातील नोकरी/रोजगार इच्छूक उमेदवारांसाठी ८ फेब्रुवारी रोजी रोजगार मेळावा

Washim Placement Drive on 8th Feb 

वाशिम,दि.6 (www.jantaparishad.com / जिमाका) जिल्हयातील नोकरी/रोजगार इच्छूक उमेदवारांना वारंवार नोकरीच्या संधी प्राप्त व्हाव्यात या उद्देशाने जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र,वाशिमच्यावतीने प्रत्येक महिन्यातील दुसऱ्या गुरुवारी पंडीत दीनदयाळ उपाध्याय प्लेसमेंट ड्राईव्ह रोजगार मेळावा (Washim Placement Drive on 8th Feb) आयोजित करण्याचे निश्चित करण्यात आले आहे.

          हा प्लेसमेंट ड्राईव्ह ‌रोजगार मेळावा जिल्हाधिकारी कार्यालय,  परिसरातील आत्मा प्रशिक्षण हॉलमध्ये ८ फेब्रुवारी २०२४ रोजी आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये प्राधान्याने स्थानिक स्तरावरील नियोक्त्याकडील उपलब्ध रिक्तपदांवर रोजगार इच्छुक उमेदवारांना रोजगार/नोकरी मिळविण्याची संधी उपलब्ध होत आहे.

          या प्लेसमेंट ड्राईव्हमध्ये १) उन्नती महिला अर्बन को.ऑफ क्रेडीट सोसायटी लि. वाशिम २) धुत ट्रान्समिशन प्रा.लि.छत्रपती संभाजीनगर ३) बेदरकर हॉस्पीटल, वाशिम ४) एल.आय.सी.कार्यालय, वाशिम ५) स्वतंत्र मायक्रोफायनन्स, वाशिम इत्यादी नामांकित कंपनी / उद्योगांकडील उद्योजक प्लेसमेंट ड्राईव्हमध्ये उपस्थित राहून प्रत्यक्षपणे उपस्थित होणाऱ्या रोजगार इच्छूक उमेदवारांची एकुण ५२ रिक्तपदांसाठी मुलाखतीद्वारे जागेवरच निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे.तरी स्त्री नोकरी इच्छूक उमेदवारांची किमान १० वी,१२ वी,आय.टी.आय.(सर्व ट्रेडस्), अभियांत्रिकी,एम.बि.बि.एस / बि.ए.एम.एस / बि.एच.एम.एस. इ. शैक्षणीक पात्रता असणारे वयोमर्यादा - १८ ते ५० मधील रोजगार इच्छूक युवक युवतीनी  www.rojgar.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर आपापल्या शैक्षणिक पात्रतेनुसार त्यांचेकडील सेवायोजन कार्ड च्या युझरनेम व पासवर्डने लॉगीनद्वारे विविध पदासाठी पसंतीक्रम नोंदवून ८ फेब्रुवारी २०२४ रोजी स्वतः प्रत्यक्षपणे आवश्यक कागदपत्रांसह स्वःखर्चाने उपस्थित राहावे,असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केन्द्र,वाशिम केंद्राच्या वतीने करण्यात येत आहे.

       या प्लेसमेंट ड्राईव्हमध्ये सहभागी होण्यासाठी ऑनलाईन नोंदणी (online registration) करावी.यासाठी आपणाकडे एम्पॉयमेंट कार्डच्या युझरनेम व पासवर्ड असणे आवश्यक आहे. नसल्यास   www.rojgar.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवरील Job Seeker वरील Register वरुन युझरनेम व पासवर्ड मिळवावा. त्यानंतर Job Seeker च्या विंडोमध्ये लॉगीन करुन डाव्या बाजुकडील पंडीत दीनदयाळ उपाध्याय जॉब फेअर वर क्लीक करावे.येथे आपणांस वाशिम जिल्हा निवडुन त्यातील WASHIM PLACEMENT DRIVE 9 मध्ये पात्रतेनुसारच्याच पदांवर अप्लाय करावे.तद्नंतर Applied असा मेसेज दिसेल.या पध्दतीने,सदर प्लेसमेंट ड्राईव्हमध्ये प्रत्यक्ष उपस्थित होण्यापूर्वी पूर्वनोंदणी करु शकता येणार आहे.अधिक माहितीसाठी कार्यालयाच्या दुरध्वनी क्र. ०७२५२-२३१४९४ यावर संपर्क साधावा.

No comments

Powered by Blogger.