Header Ads

५० रक्तदात्यांनी केले रक्तदान - blood donation camp in Karanja

५० रक्तदात्यांनी केले रक्तदान - blood donation camp in Karanja


स्व.आकाश प्रकाशराव ठाकरे यांच्या चतुर्थ स्मृतिदिनानिमित्त आयोजित रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

५० रक्तदात्यांनी केले रक्तदान

कारंजा (www.jantaparishad.com) दि.११/०२ - आपल्या स्व. मित्राच्या प्रती प्रेम भावना जपत समाजकार्याची चळवळ हाती घेवून सुरु केलेल्या रक्तदान रुपी महादानाचे सुरु केलेले कार्य अविरत आजीवन सुरु ठेवण्याच्या उद्देशाने परिवर्तन बहु. संस्था कारंजा लाड जि.वाशिम तसेच  स्व.आकाश ठाकरे मित्र परिवार कारंजा लाड जि.वाशिम यांच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरात कार्यक्रमात  दि. ११/०२/२०२४ रोजी स्थानिक श्री. दत्त मंदिर सभागृह दत्त मंदिर चौक कारंजा येथे शहरातील सर्व सुजान कर्तव्यदक्ष रक्तदात्यांनी सामाजिक बांधिलकी जपत बहुसंख्येने सहभाग नोंदवून रक्तदानाचे महादान केले. या वेळी कार्यक्रमाचे  अध्यक्षस्थान पंचायत समिती कारंजाचे मा. गटशिक्षणाधिकारी मा. श्री.माने साहेब यांनी भूषविले. तर प्रमुख पाहुणे म्हणून श्री अशोकरावजी सार्वे हजर होते. या शिबिरात ५० रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकीचा परिचय करून दिला. कार्यक्रमाचे सूत्र संचालन मा. श्री. चेतन गावंडे यांनी केले तसेच आभार प्रदर्शन श्री.मनीष एगलदरे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीते करिता परिवर्तन बहु.संस्था कारंजा, स्व. आकाश ठाकरे मित्र परिवार यांनी अथक परिश्रम घेतले.

पुढील रक्तदान शिबीर हे जूनच्या पहिल्या आठवड्यात राहील असे संस्थेच्या वतीने कळविण्यात आले. त्यावेळी देखील संस्थेचे सर्व पदाधिकारी व रक्तदाते आप्त स्वकियांनी रखरखत्या उन्हात सर्वच रक्त गटाचा तुटवडा भासु नये  व कोणाचेही प्राण रक्तावाचून जावू नये या हेतूने बहु संख्येने रक्तदान रुपी चालवलेली चळवळ बळकट करण्यात आपला मोलाचा वाटा द्यावा असे आवाहन परिवर्तन बहु.संस्था कारंजा  लाड जि.वाशिम स्व.आकाश ठाकरे मित्र परिवार कारंजा लाड जि.वाशीम यांच्या वतीने करण्यात आले. 

No comments

Powered by Blogger.