वैदर्भीय नाथ समाज संघाचा धर्मबीजोत्सव व नाथसमाज मेळावा संपन्न - vaidarbhiy nath samaj sangh news
वैदर्भीय नाथ समाज संघाचा धर्मबीजोत्सव व नाथसमाज मेळावा संपन्न
कारंजा/अकोट- दिनांक 12/ 02 - नाथ समाज कार्यात अग्रेसर असलेल्या वैदर्भीय नाथ समाज संघाच्या वतीने दिनांक 11/ 2 /2024,रविवार रोजी मौजे पुंडा, तालुका अकोट येथील नंदी महादेव संस्थानमध्ये भव्य धर्मबीजोत्सव व विभागीय नाथ समाज मेळावा अतिशय उत्साहात पार पडला.
सदर मेळाव्यास अध्यक्ष म्हणून माजी आ.डॉक्टर रणजीत पाटील माजी गृहराज्यमंत्री महाराष्ट्र, तर उद्घाटक म्हणून एडवोकेट विशाल गणगणे, (पश्चिम विदर्भ संपर्कप्रमुख भाजपा ओबीसी मोर्चा तथा अकोला लोकसभा संयोजक भारतीय जनता पार्टी) हे लाभले होते तर प्रमुख उपस्थितीमध्ये डॉ रोहित दादा माडेवार (महाराष्ट्र प्रदेश महामंत्री,भटके विमुक्त आघाडी, भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र), सुश्री. वंदना यनगंटवार (महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष, भटके विमुक्त महिला आघाडी, भारतीय जनता पार्टी), सौ.सीमा दिनेश कश्यप (भाजप भटके विमुक्त आघाडी महाराष्ट्र प्रदेश विदर्भ संयोजिका),माजी आमदार श्री नारायणराव गव्हाणकर ,माजी आमदार श्री वसंतरावजी खोटरे ,वैदर्भिनाथ समाज संघाचे संस्थापक अध्यक्ष एकनाथजी पवार,सचिव संतोषनाथजी सातपुते, डॉक्टर श्री अशोक कोळंबे (भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य), दिवाकरनाथजी गौरकर (विदर्भ समिती अध्यक्ष वैदर्भिनाथ समाज संघ), डॉक्टर श्री संजय भाऊ चौधरी (अकोला भाजपा नेते) सौ कीर्तीताई ठाकरे (पश्चिम महाराष्ट्र समिती अध्यक्ष वैदर्भीयनाथ समाज संघ) डॉक्टर श्री अरविंद लांडे (विधानसभा प्रमुख ओबीसी मोर्चा भाजपा), श्री गजानननाथ जी इंगळे (पश्चिम विदर्भ समिती उपाध्यक्ष वैदर्भिनाथ समाज संघ) तथा कनकशेठ कोटक (माजी शहराध्यक्ष भाजपा आकोट) हे होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक वैदर्भीय नाथ समाज संघाचे अध्यक्ष एकनाथ पवार यांनी केले. त्यामध्ये त्यांनी नाथ समाजाच्या व्यथा आपल्या प्रास्ताविकातून मांडल्या तर नाथ समाजाला सद्यस्थितीमध्ये असलेले आरक्षण हे पुरेसे नसून एनटीबी प्रवर्गामध्ये नाथ समाज हा अल्पसंख्यांक असून सदर समाजाकरिता भटक्या जमातीमध्ये स्वतंत्र प्रवर्ग स्थापन करण्याची निर्माण करण्याची मागणी त्यांनी यावेळी केली. तसेच नाथ समाजाला राजकीय नेतृत्व नसल्यामुळे आमचा समाज हा विकासाच्या कक्षेत अजूनतागायत आलेला नसल्याचे नमूद करून याकरिता सत्ताधारी पक्षाने त्यांच्या सर्वांगीण विकासाकरिता त्यामध्ये घरकुलाचा विषय असो, जातीच्या दाखल्याचा विषय असो अथवा बेरोजगार तरुणांचा विषय असो त्याला कुठेतरी राज्य सरकारने प्रतिसाद दिला पाहिजे असे आवाहन त्यांनी यावेळी केले. तर काही आमदार समाजाला फक्त आश्वासन देऊन त्यांना त्या आश्वासनांचा विसर पडतो आहे हे आवर्जून त्यांनी सांगितले.
आपल्या मार्गदर्शनपर मनोगतांमध्ये सुश्री वंदना यनगंटवार,माननीय श्री रोहित दादा माडेवार ,सौ सीमा दिनेश कश्यप या भाजपाच्या भटक्या विमुक्त आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांनी नाथ समाजाच्या सर्वांगीण विकासाकरिता निश्चितच भरीव प्रयत्न आपल्या स्तरावरून करू असे यावेळी सांगितले. तर माजी आमदार गव्हाणकर साहेब तथा खोटरे साहेबांनी सुद्धा मेळाव्यास मार्गदर्शन केले तर माननीय एडवोकेट विशाल गणगणे साहेबांनी नाथ समाजाच्या विविध प्रश्नांवर भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांशी लवकरच चर्चा करून जवळपास सर्व समस्यांचे समाधान आपण करूयात. याकरिता समाजाची साथ आम्हाला लागेल असे आवाहन त्यांनी केले.
नाथ समाजातील गुणवंतांचा सत्कार यावेळी करण्यात आला त्यामध्ये अमरावती कारागृहातील जेलर पदी नियुक्ती असलेल्या मीरा विजय बाबर यांचा तसेच श्री गजानननाथजी इंगळे,श्री संतोष नाथजी चिलवंते व क्रीडा क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा नाथ समाजभूषण पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. जिल्ह्यातील विविध पदांवरील नियुक्तीपत्रे मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आली.
कार्यक्रमाच्या शेवटी वैदर्भीय नाथ समाज संघाच्या पदाधिकाऱ्यांनी संस्थापक अध्यक्ष एकनाथजी पवार यांचा सहृदय जाहीर सत्कार केला तर हा सत्कार म्हणजे माझ्या आयुष्यातील अनमोल क्षण असून संपूर्ण आयुष्य समाजासाठी कार्य करण्याचे वचन यावेळी एकनाथ पवार यांनी दिले.
सदर कार्यक्रमाचा यशस्वीतेसाठी प्रकर्षाने वैदर्भीय नाथ समाज संघाचे राज्य संपर्कप्रमुख अभिषेकनाथजी पाठक यांनी मोलाची भूमिका बजावली तर नाथ वैदर्भीयनाथ समाज संघाचे मार्गदर्शक पुंडलिकनाथजी पाठक,श्री शरद नाथजी पाठक, पुंडलिकनाथजी जाधव महाराज ,जालिंदरनाथ जी जाधव ,देवानंदनाथ इंगळे आणि भारत नाथजी ठाकरे गुरुजी , विठ्ठल पाठक,पंकज जाधव, अनिकेत पाठक मुकेश पाठक, नितीन पाठक, मच्छिंद्र जाधव तसेच पुंडा येथील समस्त नाथ समाज बांधवांनी अथक परिश्रमाने हा मेळावा यशस्वी केला.



Post a Comment