Header Ads

नवनिर्माण फाऊंडेशनचे वतीने १८ फेब्रुवारी रोजी रुग्णवाहीका लोकार्पण सोहळा - Inauguration ceremony of ambulance on behalf of Navnirman Foundation

नवनिर्माण फाऊंडेशनचे वतीने १८ फेब्रुवारी रोजी रुग्णवाहीका लोकार्पण सोहळा - Inauguration ceremony of ambulance on behalf of Navnirman Foundation


नवनिर्माण फाऊंडेशनचे वतीने १८ फेब्रुवारी रोजी रुग्णवाहीका लोकार्पण सोहळा

अध्यक्ष अनुप ठाकरे यांचे स्तुत्य उपक्रम

कारंजा दि.११ - नवनिर्माण फाऊंडेशन कारंजा जि वाशिम चे अध्यक्ष श्री.अनुप ठाकरे  यांनी फाऊंडेशनच्या सामाजिक उपक्रमांतर्गत कारंजा/ मानोरा मतदार संघातील रुग्णांच्या सेवेत आणि मार्गावरील  अपघातग्रस्तांसाठी २४ तास रुग्णवाहिका सेवेच्या लोकार्पण सोहळ्याचे आयोजन केले असून सदर लोकार्पण सोहळा रविवार दिनांक १८ फेब्रुवारी २०२४ रोजी मौजे दोनद तालुका कारंजा जि. वाशिम येथे दुपारी ठीक ०३ : ०० वाजता संपन्न होणार आहे. तसेच सकळी १०.०० पासुन रोगनिदान शिबिर अंतर्गत रुग्णतपासणी करण्यात येईल तसेच रक्तदान शिबीराचे सुध्दा आयोजन केले असून गरजु रुग्णांनी व रक्त दात्यांनी सदर कार्यक्रमाचा लाभ घ्यावा.

 सदर कार्यक्रमास अत्यंत लोकप्रिय असलेले मा.आ. ओमप्रकाश उर्फ बच्चुभाऊ कडु प्रहार जनशक्ती पक्ष संस्थापक अध्यक्ष तथा अध्यक्ष दिव्याग कल्याण मंत्रालय अभियान महाराष्ट्र राज्य,मा.हेमेंद्र ठाकरे प्रहार जनशक्ती पक्ष वाशिम जिल्हाध्यक्ष तथा नगराध्यक्ष मानोरा नगर पंचायत आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत अशी माहिती नवनिर्माण फाऊंडेशनचे उपाध्यक्ष अरविंद भगत,कोषाध्यक्ष नितीन तायडे व प्रसिद्धी प्रमुख पुंडलिक लसनकुटे यांनी दिली.नवनिर्माण फाऊंडेशनच्या वतीने अनेक समाजउपयोगी उपक्रम राबविले जात असतात जसे की, ग्राम स्वच्छता अभियान,वैद्यकीय उपक्रमांतर्गत रुग्णांना दवाखाण्यासाठी सहकार्य, रक्तदान शिबिर, रुग्णवाहिका सेवा,कारंजा तालुक्यातील विविध मार्गावर  रुग्णवाहिका २४ तास अखंडपणे अपघातग्रस्तांच्या सेवेत कार्यरत असते,मदत उपक्रम व कायदे विषयक साक्षरता शिबिर सुद्धा आयोजित केले जातात.कारंज्यात विविध मार्गावर अपघाताचे प्रमाण वाढले असून अपघातग्रस्तांना वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे त्यांना प्राण गमवावा लागतो तेव्हा अनेक अपघातग्रस्तांच्या मदतीला धावून त्यांचा जीव वाचवण्यात रुग्णवाहीका अगदी देवदूताची भूमिका पार पाडत असते.अपघातग्रस्त रुग्णाची मदत करण्याइतकं पुण्य दुसरं कोणतंही नसतं,त्यांना तातडीने उपचार मिळणे आवश्यक असते जेणेकरून त्यांना जीवनदान मिळेल आणि नेमका हाच धागा पकडून नवनिर्माण फाऊंडेशनचे अध्यक्ष अनुप ठाकरे यांनी सेवेचा प्रारंभ केला आहे.आणि गेली अकरा वर्षांपासून त्यांची रुग्णवाहीका गरजूच्या मदतीकरिता अखंडपणे रस्त्यावर धावते आहे.आजपर्यंत या सेवेच्या माध्यमातून हजारोच्या वर रुग्णांचे प्राण वाचले आहे.

तरी या लोकार्पण सोहळ्याच्या कार्यक्रमास संपूर्ण जिल्ह्यातील  सहकारी व नवनिर्माण फाऊंडेशनचे पदाधिकारी, हितचिंतक, जिल्ह्यातील सर्व जनतेने कार्यक्रमास वेळेवर उपस्थित राहावे असे आवाहन नवनिर्माण फाऊंडेशनच्या संचालकांच्या वतीने करण्यात आले आहे.

No comments

Powered by Blogger.