Header Ads

वकील संघाने दिले तहसीलदारांना निवेदन Karanja vakil sangh news

वकील संघाने दिले तहसीलदारांना निवेदन Karanja vakil sangh news


वकील दाम्पत्याच्या निर्घृण हत्येचे कारंजात पडसाद

वकील संघाने दिले तहसीलदारांना निवेदन

कारंजा  दि 29 - अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी येथील एड.राजाराम आढाव व ऍड. मनीषा आढाव यांचे निर्घृण हत्ये  संदर्भात कारंजा वकील संघाने दिनांक 29 जानेवारी रोजी तातडीची बैठक बोलावून वकील संघाच्या बैठकीत तीव्र निषेध व्यक्त करण्यात येऊन कामकाजा पासून अलिप्त राहले.

 राहुरी येथील आढाव या वकील दांपत्यांचा समाजकंटक व गुंड प्रवृत्तीच्या आरोपींनी खंडणीसाठी या वकील दांपत्याची जी अमानुष  हत्या केली ती माणुसकीला काळीमा फासणारी घटना असून अशाप्रकारे कायद्याचे रक्षण करणाऱ्या  वकिलांना दुष्ट प्रवृत्तीचा मुकाबला करावा लागत असेल तर राज्यातील कायदा व सुव्यवस्थेवर  प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. याबाबत कारंजा वकील संघाने तातडीने बैठक बोलावून रीतसर ठराव घेण्यात आला व सदर प्रकरणाचा कसून तपास करण्यात येऊन सीआयडी कडे तो सोपं सोपविण्यात यावा व प्रकरण जलद न्यायालयात चालवून आरोपींना कठोर शिक्षा देण्यात यावी तसेच सुरक्षेतेच्या दृष्टीने राज्यात एडवोकेट प्रोटेक्शन एक्ट पारित करण्यात यावा  अशा मागण्यांची निवेदन आज  तहसीलदारांना कारंजा तालुका वकील संघाच्या देण्यात आले. 

यावेळी कारंजा तालुका वकील संघाचे अध्यक्ष निलेश कानकिरड (पाटील,) एड. ज्योति बाजड, अॅड.स्वप्निल नायसे ऍड अरुण खंडागळे, ऍड राहुल बांडे एड. अब्दुल माजिद ऍड. प्रीती नांदे, ऍड. लाहोटी, ऍड डी व्ही राठोड, ऍड. सचिन बाकडे, ऍड. मनवर ऍड. सावळे, ऍड. अठोर, ऍड. विजय छल्लानी, ऍड. वाडेकर, ऍड. जोहारापूरकर, ऍड. कानतोडे ऍड. मिलिंद खंडारे, ऍड. अनिल पवार, ऍड. रजनीश शर्मा, ऍड. दिलीप भगत ऍड. चौधरी, ऍड. मुकेश बाबरे. ऍड. ठाकरे, ऍड. सौ राऊत, ऍड.. गुजर ऍड. मेश्राम, ऍड. फारुख खान, ऍड. अवेश खान, ऍड. धनंजय डाखोरे, ऍड. मोहाडे आदी ची उपस्थिती होती.

No comments

Powered by Blogger.