Header Ads

राहुल खांडेकर "महात्मा फुले आदर्श कार्यकर्ता राज्यस्तरीय" पुरस्काराने सन्मानित - Rahul Khandekar M. Fule adarsh karyakarta

राहुल खांडेकर "महात्मा फुले आदर्श कार्यकर्ता राज्यस्तरीय" पुरस्काराने सन्मानित - Rahul Khandekar M. Fule adarsh karyakarta


राहुल खांडेकर "महात्मा फुले आदर्श कार्यकर्ता राज्यस्तरीय" पुरस्काराने सन्मानित 

कारंजा दि 28 - प्रत्यक्ष आंबेडकरी चळवळीमधे व सोशल मिडियाच्या माध्यमातून अनेक वर्षापासून काम करून व समाजाला एक विचारपीठ देऊन नवी क्रांति करणारे बहुजन संघटक फेसबुक पेज व युट्यूब चैनलचे संयोजक राहुल खांडेकर यांच्या उल्लेखनीय कामगिरिची दखल घेत त्यांना इंडियन स्टूडेंट कॉन्सिल व महाराष्ट्र संचलनालय पुरातत्व विभाग, पुणे यांच्या संयुक्त विद्यामाने महात्मा ज्योतिबा फुले आदर्श कार्यकर्ता राज्यस्तरीय पुरस्कार 11 जाने. ला जाहीर झाला होता. हा पुरस्कार अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते व मुख्य आयोजक प्रा.डॉ.ज्ञानोबा कदम यांच्या उपस्थितीत पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे.

खांडेकर हे फुले शाहू आंबेडकरी चळवळीत विद्यार्थी दशेपासून कारंजा, वाशिम जिल्हा परिसर तसेच छत्रपती संभाजी नगर, (औरंगाबाद) पिंपरी चिंचवड, भोसरी, पुणे विभाग, मुंबई इत्यादी ठिकाणी प्रत्यक्षरित्या व सोशल मिडियाद्वारे फेसबुक, युट्यूब सारख्या माध्यमातुन काम करीत आहेत. तसेच विद्यार्थी शैक्षणिक व करियर शिबिर सोबतच आर्थिक मदत कार्यक्रम, रक्तदान शिबिरे, अशा अनेक प्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन करत असतात. तसेच यापूर्वी त्यांना महाकवी वामनदादा कर्डक काव्य पुरस्कार, नागसेन फेस्टिवल 2023 चा मिलिंद सन्मान पुरस्कार, भीमशक्तीचा भीमशक्ती प्रबोधन पुरस्कार 2023 देऊन गौरवविण्यात आले आहे.

कोरोनामधे लॉकडाउन सारख्या परिस्थितिवर मात करण्यासाठी सोशल मिडिया वर हा नविन उपक्रम सुरू केला. बहुजन संघटक नावाचे फेसबुक पेज व युट्यूब चैनल हे राज्यभर लोकप्रिय आहे, याच पेज व चैनल वर दररोज व्याख्यानमालिका चालते. या चैनल वर महाराष्ट्रातील अनेक दिग्गज नेते, बहुजन चळवळीतील विचारवंत, विशेष श्रेत्रातील संशोधक, कलावंतांचे  व्याख्यान झालेले आहेत. आपल्या लिखाणाच्या माध्यमातून आणि मुलाखतीच्या माध्यमातून अनेकांचे कार्य समाजापर्यंत पोचवण्याचे काम केले. महाकवी वामनदादा यांच्या अनुयायांच्या 50 मुलाखती त्यांनी आयोजित केल्या. अनेक मान्यवर, संशोधक आणि समाजातील वेगवेगळ्या स्तरातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या लोकांच्या मुलाखती त्यांनी घेतल्या. 

हा पुरस्कार सोहळा दि. 27 जाने. 2024 रोजी सायं. 4 वाजता म.फुलेवाडा गंज पेठ समता भुमी पुणे येथे पार पडला. खांडेकर यांचे राज्याच्या सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

No comments

Powered by Blogger.