Header Ads

Tahsil Aplya Dari By IAS Dr. Apurva Basur - तहसीलदार कारंजा डॉ. अपूर्वा बासुर (भाप्रसे) यांचे संकल्पनेतून "तहसील आपल्या दारी" उपक्रम

Tahsil Aplya Dari By IAS Dr. Apurva Basur - तहसीलदार कारंजा डॉ. अपूर्वा बासुर (भाप्रसे) यांचे संकल्पनेतून "तहसील आपल्या दारी" उपक्रम


तहसीलदार कारंजा डॉ. अपूर्वा बासुर (भाप्रसे) यांचे संकल्पनेतून "तहसील आपल्या दारी" उपक्रम

ग्राम मेहा येथे "तहसील आपल्या दारी" कार्यक्रम संपन्न

कारंजा दि. 23 (www.jantaparishad.com) - तहसील अंतर्गत मौजे -मेहा या गावामध्ये डॉ. अपूर्वा बासुर भाप्रसे तथा तहसीलदार कारंजा (IAS Dr. Apurva Basur Tahsildar Karanja) यांच्या संकल्पनेतून तहसील आपल्या दारी (Tahasil Aplya Dari) दि. 22/12/2023 रोजी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमा मध्ये डॉ. अपूर्वा बासुर यांनी स्वतः मेहा येथील नागरिकांच्या  तक्रारी व समस्या जाणून घेऊन निराकरण केले.

 तहसील आपल्या दारी या कार्यक्रमामध्ये महसूल विभागा अंतर्गत पुरवठा विभागाचे 20 अर्ज प्राप्त झाले तसेच सगायो मधील 4 अर्ज प्राप्त झाले त्यात तिथल्या तिथेच कार्यवाही करून निकाली काढण्यात आले आहे. तसेच महसूल विभागातील प्राप्त इतर तक्रारी निकाली काढण्यात येतील व इतर विभागाच्या सुद्धा तक्रारी निकाली काढण्यात येतील.

 "तहसील आपल्या दारी" या कार्यक्रमांमध्ये ग्रामपंचायत चे सरपंच सौ. प्रतिभा प्रमोद बोबडे, उपसरपंच सौ. रेखा अशोक मेश्राम तसेच ग्रामपंचायत इतर सदस्य व गावातील नागरिक तसेच ना.तहसीलदार हरणे,ना. तहसीलदार बनसोड, मंडळ अधिकारी, प्रस्तुतकार श्री. ठोंबरे, तलाठी मेहा, तसेच कृषी विभागामार्फत कृषी सेवक तसेच ग्रामसेवक व इतर विभागातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

No comments

Powered by Blogger.