Header Ads

Mobile Shop on e-Vehicle Scheme - मोबाईल शॉप ऑन ई-व्हेईकल योजना

Mobile Shop on e-Vehicle Scheme - मोबाईल शॉप ऑन ई-व्हेईकल योजना


मोबाईल शॉप ऑन ई-व्हेईकल योजना

दिव्यांग व्यक्तींकडून 4 जानेवारी पर्यंत अर्ज मागविले

Mobile Shop on e-Vehicle Scheme

वाशिम, दि. 22 (जिमाका / jantaparishad.com) : दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबी होण्याच्यादृष्टीने हरित उर्जेवर चालणाऱ्या पर्यावरणस्नेही फिरत्या वाहनावरील दुकान (Mobile Shop on e-Vehicle Scheme) मोफत उपलब्ध करुन देण्याकरीता या योजनेस शासनाने मान्यता दिली आहे. या योजनेच्या अंमलबजावणीची कार्यवाही महाराष्ट्र दिव्यांग वित्त व विकास महामंडळ, मर्या. यांचेस्तरावरुन सुरु आहे.

दिव्यांग व्यक्तींना पुरेशा सोयी सुविधा उपलब्ध करुन रोजगार निर्मितीस चालना देणे.

दिव्यांग व्यक्तींचे आर्थिक, सामाजिक पुनर्वसन करणे. सर्वसामान्य व्यक्तींप्रमाणे दिव्यांग व्यक्तींना परिवार/ कुटुंबासमवेत जीवन जगण्यास सक्षम करणे हा या योजनेचा उद्देश आहे. योजनेचा लाभ गरजू दिव्यांग व्यक्तींना मिळण्यासाठी अर्जदारांना नाव नोंदणी करण्यासाठी 3 डिसेंबर 2023 रोजी पोर्टल सुरु करण्यात आले आहे. दिव्यांग व्यक्तींकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यासाठी https://evehicleform.mshfdc.co.in ही लिंक उपलब्ध करुन देण्यात आली आहे. या लिंकद्वारे दिव्यांग व्यक्तींना ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी 4 जानेवारी 2024 पर्यंत मुदत देण्यात आली आहे. तरी या योजनेचा लाभ जास्तीत जास्त दिव्यांग व्यक्तींनी घ्यावा. असे आवाहन महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त आणि विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापकांनी केले आहे.

No comments

Powered by Blogger.