Header Ads

SaaS participated in disaster management training program at Yashda - सास चा यशदा येथील आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण कार्यक्रमात सहभाग

 

SaaS participated in disaster management training program

सास चा यशदा येथील आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण कार्यक्रमात सहभाग 

कारंजा दि. 18 (www.jantaparishad.com) - वाशिम जिल्ह्यामधील गेल्या पंचवीस वर्षापासून विविध सामाजिक उपक्रमांमध्ये ग्रामविकास व आपत्ती व्यवस्थापन या क्षेत्रामध्ये सर्वसामान्यांची समजली जाणारी सर्व धर्म मित्र मंडळ या संस्थेची ओळख आपण सर्वांना आहे त्यांच्या या कार्याबद्दल व येणाऱ्या भविष्यातील आपत्ती काळामध्ये समुदाय आधारित घडामोडींचा अभ्यास व नियोजन करण्याच्या हेतूने पुणे येथे यशदा या ठिकाणी झालेल्या प्रशिक्षण कार्यक्रमात सर्व धर्म मित्र मंडळ चे अध्यक्ष श्याम सवाई (Shyam Sawai SaaS Karanja lad) यांना उपस्थित राहून प्रशिक्षण घेण्याची संधी मिळाली त्यांच्याबरोबर वाशिम जिल्ह्यातून कारंजा तहसीलदार  कुणाल झाल्टे, जिल्हास्तरीय शिक्षण विभागाचे विस्तार अधिकारी बबनराव सुर्वे, जिल्हा सामान्य रुग्णालयाचे डॉ हरन, यांचाही सहभाग यामध्ये होता. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधील मंडळी या प्रशिक्षण कार्यक्रमात सहभागी होती. 



सदर शिबिरामध्ये वातावरणातील बदल व त्यानिमित्त होणाऱ्या आपत्ती अशा काळामध्ये मदतकार्य एक दोन दिवस आठ दिवस चालतो पण त्या आपत्तीमुळे व्यापीत झालेल्या समुदायाचा भविष्यातील विचार विनिमय त्यांच्या मानसिकतेचा व त्यांच्या सध्याच्या जीवनात पद्धतीचा सुद्धा अभ्यास व्हावा जेणेकरून मानसशास्त्र इत्यादी विषयांवर सदर प्रशिक्षणाला सासद्वारे करत असलेल्या प्रशासकीय व जनता यामधील उत्तम समन्वयाचा कार्याची तिथे विशेष प्रशंसा करण्यात आली.

सदर कार्यक्रमांमध्ये पुणे येथील सीमा निकम मॅडम, वैशाली पाटकर मॅडम, विवेक नायडू सर, मिलिंद वैद्य सर, पंकज दसले, यांचे मार्गदर्शन मिळाले

No comments

Powered by Blogger.