Header Ads

karanja NP failed to implement disabled welfare scheme - दिव्यांग कल्याणाच्या योजना राबविण्यात कारंजा नगर पालिका अयशस्वी

karanja NP failed to implement disabled welfare scheme - दिव्यांग कल्याणाच्या योजना राबविण्यात कारंजा नगर पालिका अयशस्वी


दिव्यांग कल्याणाच्या योजना राबविण्यात कारंजा नगर पालिका अयशस्वी   

 महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त दिव्यांग जनसेवक आणि महाराष्ट्र अपंग संस्थेचे अध्यक्ष संजय कडोळे यांचा आरोप

कारंजा दि. 18 : केन्द्र सरकार आणि महाराष्ट्र शासनाने दिव्यांग कल्याणा करीता भरघोस योजना जाहिर केलेल्या असल्या तरी सुद्धा आमदार राजेन्द्र पाटणी यांच्या दुर्लक्ष्यामुळे आणि स्थानिक नगर पालिका प्रशासनाच्या अक्षम्य कारभारामुळे प्रत्यक्षात, दिव्यांग कल्याण योजनांची प्रत्यक्ष अंमल बजावणीच होतांना दिसत नाही. नगर पालिकेने "शासन आपल्या दारी" कार्यक्रमातही दिव्यांग कल्याण योजनांचा समावेश केला नाही. त्याऐवजी नगर पालिका प्रशासनाचे केवळ मालमत्ता करवसुली कडेच संपूर्ण लक्ष केन्द्रित असल्याचे वास्तव आहे. स्थानिक निराधार व दिव्यांगाना नगर पालिकेकडून घरकुलाची योजना अद्याप पर्यंत राबविण्यात आलेली नाही. शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्या सहाय्याने कृत्रिम साधने, कॅलिपर्स, कुबड्या, तिन चाकी सायकल, बधिरांना श्रवणयंत्रे, नगर पालिकेचा दिव्यांग निधी कशाचेही वाटप होतांना दिसत नाही. एवढेच काय ? तर खर्‍याखुऱ्या दिव्यांगाची नोंदणी करून, नगर पालिका हद्दीतील दिव्यांगाच्या संख्येची गणणाही नगर पालिकेकडे नाही. महत्वाचे म्हणजे दिव्यांगाची आरोग्य तपासणी करण्याचे सौजन्यही कारंजा नगर पालिका केव्हाच दाखवीत नाही. त्यामुळे शासनाने कारंजा नगर पालिकेला जाब विचारून दिव्यांग कल्याण योजनांची प्रभावीपणे अंमल बजावणी करावी. 

अशी रीतसर विनंतीवजा मागणी करणारी तक्रार स्थानिक महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त दिव्यांग जनसेवक आणि महाराष्ट्र अपंग संस्थेचे अध्यक्ष संजय कडोळे यांनी महाराष्ट्र शासनाच्या दिव्यांग विभागाचे अध्यक्ष (कॅबिनेट मंत्री दर्जा) बच्चुभाऊ कडू (अध्यक्ष महाराष्ट्र दिव्यांग कल्याण मंडळ), मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे,उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस,दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार,सचिव महाराष्ट्र दिव्यांग कल्याण मंडळ, महाराष्ट्र शासन मुंबई, सचिव नगर विकास, महाराष्ट्र शासन मुंबई आणि मुख्य सचिव सामान्य प्रशासन महाराष्ट्र शासन मुंबई यांचेकडे सादर केली आहे.

No comments

Powered by Blogger.