Header Ads

MLC Dhiraj Linghate mentioned to solve the problems - सर्व पदवीधर मतदारांच्या समस्या सोडविण्यात येईल

MLC Dhiraj Linghate mentioned to solve the problems - सर्व पदवीधर मतदारांच्या समस्या सोडविण्यात येईल


सर्व पदवीधर मतदारांच्या समस्या सोडविण्यात येईल

आ.धीरजभाऊ लिंघाडे यांचे प्रतिपादन

शैक्षणिक साहित्याचा लोकार्पण सोहळा संपन्न 

कारंजा लाड  दि. 24 (www.jantaparishad.com) - नुसत्याच 10 महिने पहिले संपन्न झालेल्या पदवीधर मतदार संघातील निवडणुकीत पदवीधर मतदारांनी भरघोस मतांनी मला निवडून देऊन माझ्यावर जो विश्वास टाकला त्याला कोणत्याही प्रकाराचा तडा जाऊ न देता ज्यांनी मतदान केलं अथवा नाही केल त्या सर्व पदवीधर मतदारांच्या समस्या सोडविण्याचा माझा प्रयत्न राहील असे प्रतिपादन काँग्रेस चे अमरावती विभागीय पदवीधर मतदार संघाचे लोकप्रिय आमदार धीरजभाऊ लिंघाडे यांनी केले आहे. 

     आमदार धीरजभाऊ लिंघाडे यांच्या स्थानिक विकास निधीतून 47 लक्ष रूपयाचा शैक्षणिक साहित्याचा [ डिजिटल स्मार्ट पॅनल ] वाशिम जिल्ह्यातील शाळा व महाविद्यालयाला वाटप करण्याचा लोकार्पण सोहळा दि. 22 डिसेंबर रोजी वाशिम येथे संपन्न झाला त्यावेळेस प्रमुख अतिथी म्हणून बोलतांना त्यांनी हे मत व्यक्त केलं.

       पुढे बोलतांना धीरजभाऊ म्हणाले कि डिजिटल स्मार्ट पॅनल चे टप्प्या टप्प्याने सर्वच शाळा व महाविद्यालयांना वाटप करण्यात येईल मग ती संस्था कोण्याही पक्षाच्या ताब्यात असेल तरीही यामध्ये कोणत्याही प्रकारचा पक्षभेद करण्यात येणार नाही.

              ह्या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी वाशिम जिल्हा काँग्रेस चे अध्यक्ष आमदार अमित भाऊ झनक तर प्रमुख अतिथी म्हणून आमदार धीरजभाऊ लिंघाडे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस चे सचिव दिलीपभाऊ सरनाईक, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस चे सचिव दिलीपभाऊ भोजराज, जिल्हा परिषद सदस्य व राष्ट्रवादी काँग्रेस चे जेष्ठ नेते पांडुरंगजी ठाकरे, माजी जिल्हा परिषद सदस्य किसनरावजी मस्के, वाशिम जिल्हा काँग्रेस सेवादल चे जिल्हा समन्वयक अँड.संदेश जैन जिंतुरकर, ॲड.अंभोरे प्रामुख्याने व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी पांडुरंगजी ठाकरे , दिलीपभाऊ सरनाईक यांनी आपले मनोगत व्यक्त केले तर अमित भाऊ झनक यांनी अध्यक्षीय भाषण केले यानंतर वाशिम जिल्ह्यातील 31 शाळा व महाविद्यालयांना प्रमुख अतिथींच्या हस्ते डिजिटल स्मार्ट पॅनल चे वितरण करण्यात आले.

         कार्यकमाचे सूत्रसंचालन महादेवराव सोळंके तर आभार प्रदर्शन हरिषभाऊ चौधरी यांनी केले.

कोई टिप्पणी नहीं

Blogger द्वारा संचालित.