Header Ads

आरोग्य तपासणी शिबिराला भक्कम प्रतिसाद - arogya tapasani shibir washim

आरोग्य तपासणी शिबिराला भक्कम प्रतिसाद - arogya tapasani shibir washim


वाशिम येथील मराठी पत्रकार परिषदेच्या पत्रकार आरोग्य तपासणी शिबिराला भक्कम प्रतिसाद!

राज्यभरात दहा हजारावर पत्रकारांची आज आरोग्य तपासणी!

वाशिम ता.6( प्रतिनिधी) - वाशिम येथील पत्रकार भवन मध्ये बुधवार( दि.6) रोजी अ.भा. पत्रकार परिषद मुंबई सलग्न वाशिम जिल्हा पत्रकार संघ व जिल्हा सामान्य रुग्णालय वाशिम यांच्या संयुक्त विद्यमाने पत्रकार आरोग्य तपासणी शिबिर जिल्हा सामान्य रुग्णालयाचे शल्ल्य चिकित्सक डॉ.अनिल कावरखे व मराठी पत्रकार परिषदेचे वाशिम जिल्हा अध्यक्ष माधवराव अंभोरे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आले होते. अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या 85 व्या वर्धापन दिनाच्या निमित्त हे पत्रकार आरोग्य तपासणी शिबिर आयोजित केले गेले. अ. भा. मराठी पत्रकार परिषदेच्या वर्धापन दिनाच्या औचित्याने प्रतिवर्षी राज्यभरात दहा हजारावर पत्रकारांची आरोग्य तपासणी केली जाते.



पत्रकारांचे जीवन हे नेहमीच धकाधकीचे जिवन झालेले आहे. जनसामान्यांचे प्रश्न सोडवित असताना पत्रकारांना त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याकडे लक्ष राहत नाही आणि पत्रकारितेच्या स्पर्धेमध्ये त्याचे भानसुद्धा राहत नाही. मात्र पत्रकार सुद्धा व्यक्ती आहे व परिणामी शारीरिक व्याधी सुद्धा ऊद्भवू शकतात. त्या अनुषंगाने अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद प्रतिवर्षी वर्धापन दिनि  पत्रकारांचे आरोग्य तपासणी शिबिर सहा डिसेंबर रोजी आयोजित करीत असते. त्याचाच एक भाग म्हणून अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या सलग्न असलेल्या वाशिम जिल्हा पत्रकार संघ व जिल्हा सामान्य रुग्णालय वाशिम यांच्या संयुक्त विद्यमाने स्थानिक पत्रकार भावनात पत्रकार आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. 



जिल्हा सामान्य रुग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर अनिल कावरखे व डॉक्टर बालाजी हरण यांचे व मराठी पत्रकार परिषदेचे जिल्हाध्यक्ष माधवराव अंभोरे व  सचिव विश्वनाथ राऊत यांचे मार्गदर्शनाखाली घेण्यात आले. यामध्ये आरोग्य तपासणी तपासणी, दंत तपासणी, मधुमेह तपासणी, ईसीजी, सर्व प्रकारच्या रक्त तपासण्या, कॉलिएटिव्ह केअर सह विविध प्रकारच्या तपासण्या करण्यात आल्या. 

यावेळी प्रामुख्याने मेडिसिन तज्ञ हृदयरोग तज्ञ डॉक्टर प्रतिक महाजन, मनोविकार तज्ञ राहुल कसादे, दंतरोगतज्ञ रणजित गंडागुळे, त्यांचा  इसीजी टेक्निशियन उदय थोरवे, लॅब टेक्निशियन सोनल राजेंद्र मिश्रा एनसीडी कौन्सिलर काळे हिंद लॅबचे प्रेम राठोड व स्टॉप नर्स मध्ये नम्रता सरकटे सुजाता राठोड शालिनी शेळके रिना वानखेडे आधीचा सहभाग होता यावेळी शहरातील समस्त पत्रकारांनी आपल्या आरोग्य तपासणी मध्ये सहभाग घेऊन आपल्या आरोग्याची काळजी घेतली व व पत्रकार आरोग्य तपासणी शिबिरात भक्कम प्रतिसाद दिला

No comments

Powered by Blogger.