Header Ads

महामानवाला अभिवादन, भव्य मोटरसायकल रैली संपन्न -mahamanavala abhivadan motar rally in Karanja

महामानवाला अभिवादन, भव्य मोटरसायकल रैली संपन्न -mahamanavala abhivadan motar rally in Karanja


महामानवाला अभिवादन, भव्य मोटरसायकल रैली संपन्न 

कारंजा (www.jantaparishad.com) दि. 06 - स्थानिक शहरात दरवर्षी प्रमाणे यंदाही विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वान दिनानिमित्त 6 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 9:15 वाजता भव्य अभिवादन मोटरसायकल रैलीचे आयोजन करण्यात आले होते.

रैली सुरू होण्यापूर्वी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात अगोदर प्रतिमेचे पूजन व वंदन करण्यात आले त्यानंतर रैलीला सुरुवात करण्यात आली रैली अतिशय शांतबद्ध पद्धतिने "बुद्धम शरणम् गच्छामी" च्या गजरात तसेच समस्त बहुजन महापुरुशांना हारार्पण करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून प्रारंभ होऊन जयस्तंभ चौक, नेहरू चौक, मेन रोड, नगीना मस्जिद, महात्मा फुले चौक, रामासावजी चौक, जिजामाता चौक, पोहावेस मार्गे, झासीरानी चौकातुन, पुढे जाऊन नविन बस स्टैड मार्गे, अशोक नगर येथे रैलीचा समारोप करण्यात आला.

तसेच रैलीला कारंजा तालुक्यातील समस्त आंबेडकरी अनुयायी बहुसंख्येने आपआपल्या मोटर सायकल व पंचशील, निळे ध्वज घेऊन रैलीला उपस्थित राहून चांगला प्रतिसाद दिला. या रैलीच्या यशस्वीतेसाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर अभिवादन रैली समितीचे अध्यक्ष महादेवराव ठोंबरे, उपाध्यक्ष सचिन खांडेकर, किशोर उके, धम्मपाल कुलकर्णी, सतीश गुळदे, योगेश खंडारे यांनी अथक परिश्रम घेतले. तर कार्यक्रमाचे सूत्र संचालक सचिन खांडेकर यांनी केले.

No comments

Powered by Blogger.