Header Ads

महामार्ग पोलीस प्रादेशिक विभाग नागपूर द्वारे सास सन्मानित - SAAS Karanja hounered by divisional highway police

महामार्ग पोलीस प्रादेशिक विभाग नागपूर द्वारे सास सन्मानित - SAAS Karanja hounered by divisional highway police


महामार्ग पोलीस प्रादेशिक विभाग नागपूर द्वारे सास सन्मानित

सर्वधर्म मित्र मंडळ च्या वन सेकंड वन कॉल न्यू लाईफ अभियान ची महामार्ग पोलिसांकडून दखल

जागतिक स्मरण दिन निमित्य नागपूर येथे आयोजन

 कारंजा  दि. २४ -  विदर्भातील वाशिम जिल्ह्यात गेल्या पंचवीस वर्षापासून विविध सामाजिक उपक्रमात सक्रिय सहभागी असणाऱ्या सर्व धर्म मित्र मंडळ च्या गेल्या सोळा वर्षापासून रोड अपघातग्रस्तांना मदतीचा हात देऊन प्रथमोपचार व वैद्यकीय मदत देण्याकरिता धडपड करणाऱ्या सर्व धर्म आपत्कालीन पथक सास शोध व बचाव पथक संस्थापक श्याम रामदास सवाई व सहकारी दीपक प्रकाश सोनवणे, अजय हिरामण ढोक यांचा नागपूर येथे जागतिक स्मरण दिन चे निमित्य साधून महामार्ग पोलीस प्रादेशिक विभाग नागपूर पोलीस अधीक्षक श्री यशवंत सोळंके यांनी प्रमाणपत्र व गुच्छ देऊन सन्मान केला. 

याप्रसंगी महामार्ग पोलिसांकद्वारे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींबाबत संवेदना व्यक्त करत त्यांचे स्मरण करत त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. अपघातग्रस्त परिस्थितीमध्ये मदतीचा हात देणाऱ्या मृत्युंजय स्वयंसेवक व जीव रक्षकांचा सन्मान करणे या उपक्रमात सर्वधर्म मित्र मंडळ कारंजा लाड द्वारे गेल्या सोळा वर्षापासून चालत असलेल्या रोड अपघातग्रस्तांना मदतीच्या कार्याची खास करून सास कंट्रोल रूमच्या वन सेकंद वन कॉल न्यू लाईफ अभियान ची नोंद घेऊन सन्मानित केले.

 वाशिम जिल्हा व इतर महामार्गावरील अपघाताचे प्रमाण कमी व्हावे त्यात मृत्यू दर कमी व्हावा तसेच रोड सेफ्टी अभियान इत्यादी बाबत सर्व धर्म मित्र मंडळ कार्य करत आहे. नव्याने निर्माण झालेल्या समृद्धी महामार्ग व त्यावरील समस्या व त्यावरील वाढते अपघात व त्याकरिता करावयाच्या उपाययोजना याबाबत सुद्धा सर्व धर्म मित्र मंडळ आपल्या अभ्यासगटाद्वारे वेगवेगळी ऍक्टिव्हिटीज करत आहेत. 

सदर कार्यक्रमाच्या प्रसंगी अमानी महामार्ग पोलीस मदत केंद्र क्षेत्रातील अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्या पोलीस पाटील विजुभाऊ पांडे आणि गुलाब पठाण यांचाही सत्कार याप्रसंगी करण्यात आला.

 यावेळेस अमानी महामार्ग पोलीस सहनिरीक्षक नितीन दादंळे साहेब, व कर्मचारी वैभव भाऊ झेलकर यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. 

रोड अपघातग्रस्तांना तात्काळ मदत मिळावी तसेच महामार्ग वरील अपघाताची माहिती तात्काळ मदत केंद्राला प्राप्त व्हावी याकरिता प्रथम दर्शी कर्तव्य सेवकांनी पोलीस कंट्रोल रूम किंवा सास कंट्रोल रूम ला अपघाताची किंवा घटनेची माहिती तात्काळ द्यावी असे आवाहन यावेळेस सर्व धर्म मित्र मंडळाच्या वतीने श्याम सवाई यांनी व्यक्त केले

No comments

Powered by Blogger.