Header Ads

कारंजा शहर पोलिस स्टेशन चे ठाणेदार दिनेशचंद्र शुक्ला यांचे सोशियल मिडीयाचे संदर्भात जनतेला जाहीर आवाहन Appeal by PI Karanja lad Dineshchandra Shukla

कारंजा शहर पोलिस स्टेशन चे ठाणेदार दिनेशचंद्र शुक्ला यांचे  सोशियल मिडीयाचे संदर्भात जनतेला जाहीर आवाहन Appeal by PI Karanja lad Dineshchandra Shukla


  सोशियल मिडीयाचा वापर जरा जपून करा ! 

कारंजा शहर पोलिस स्टेशन चे ठाणेदार दिनेशचंद्र शुक्ला यांचे जनतेला जाहीर आवाहन

कारंजा (www.jantaparishad.com) दि.२४ - कारंजा शहर पोलिस स्टेशन चे ठाणेदार दिनेशचंद्र शुक्ला (PI Karanja lad Dineshchandra Shukla) यांनी सोशियल मिडीयाचा वापर करतांना नागरिकांनी काळजी घ्यावी जेणेकरून शहरात शांतता व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याबाबत जनतेला खालील प्रमाणे आवाहन केले आहे. 

      आजच्या सोशल मीडियाच्या अतिवापरामुळे समाजात तेढ निर्माण करणाऱ्या पोस्ट व्हायरल केल्या जातात त्यामध्ये थोर पुरुषांचे अपमान, धर्माधर्मा मध्ये तेढ निर्माण करणाऱ्या पोस्ट व्हाट्सअप स्टेटस वर ठेवून, इंस्टाग्राम वर स्टोरी ठेवून, फेसबुकच्या माध्यमातून समाजामध्ये तेढ निर्माण केले जाते.

    जाती-धर्मामध्ये तेढ निर्माण करणाऱ्या पोस्ट प्रकाशित करणे, स्टेटस ठेवणे हे कायद्याने गुन्हा आहे त्या संबंधाने विविध कायदे  आहेत. अशा पोस्ट व्हायरल करणे कायद्याने गुन्हा असून पोस्ट व्हायरल करणाऱ्या वर योग्य कलमानुसार कायदेशीर कारवाई करण्यात येते आणि त्यानुसार त्यांना तांत्रिक बाबी पुरावा असल्याने शिक्षा सुद्धा निश्चित मिळते, त्यामुळे मी आव्हान करतो की, सोशल मीडियाच्या माध्यमातून जातीजातीमध्ये धर्माधर्मात तेढ निर्माण करणाऱ्या कुठल्याही पोस्ट किंवा वक्तव्य किंवा लेख प्रकाशित करू नये , असे करणाऱ्या विरोधात तात्काळ प्रभावी कारवाई करण्यात येईल हे निश्चित आहे. तसेच अशी पोस्ट व्हायरल झाल्यानंतर संबंधित यंत्रणांना माहिती देणे गरजेचे आहे. माहिती न देता स्वतः अशा व्यक्तीला स्वतः चोप देणे , कायदा हातात घेणे, चार चौघांचे एकत्रित येऊन कायदा आणि सुव्यवस्था भंग करणे हा सुद्धा कायद्याने फार मोठा गुन्हा आहे.

     त्यामुळे जर आक्षेपार्य ,भावना दुखावणाऱ्या पोस्ट व्हायरल झाल्यास  त्या पोस्ट बाबत तात्काळ संबंधित यंत्रणांना माहिती देणे . सदर पोस्ट संदर्भात स्वतः किंवा कोणत्याही गटाने कायदा हातात घेऊ नये अशा घटनांची माहिती तात्काळ संबंधित यंत्रणेला द्यावी त्या अनुषंगाने समाजामध्ये शांतता आणि सुव्यवस्था प्रस्थापित राहील.


No comments

Powered by Blogger.