साप्ताहिक कारंजा वृत्त केशरी च्या दिवाळी विशेषांक चे धाटात प्रकाशन - Diwali vishesh ank prakashan
साप्ताहिक कारंजा वृत्त केसरी च्या दिवाळी विशेषांक चा प्रकाशन सोहळा थाटात संपन्न
अनेक मान्यवरासह उपजिल्हाधिकारी तथा साहित्यिक व कादंबरीकार यांची उपस्थिती
वृत्त केसरी चा नियमित दरवर्षी दिवाळी अंक निघणे म्हणजे कारंजा वासियांकरिता अभिमानास्पद बाब - विश्वनाथराव घुगे उपजिल्हाधिकारी वाशिम यांचे प्रतिपादन
कारंजा वृत्त केसरीचा दिवाळी अंक म्हणजे कारंजेकरां करीता उत्कृष्ट मेजवानीच -- कादंबरीकार बाबारावजी मुसळे यांचे प्रतिपादन
कारंजा दि. २८ ( प्रतिनिधी ) - मागील बऱ्याच वर्षापासून वाचकांच्या खरे खुरे पसंतीस उतरलेले साप्ताहिक कारंजा वृत्तकेसरी च्या द्वितीय दिवाळी अंका चा प्रकाशन सोहळा काल स्थानिक महेश भवन येथे अनेक मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला.
यावेळी प्रकाशन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी निवासी उपजिल्हाधिकारी मा विश्वनाथराव घुगे होते तर या प्रकाशन सोहळ्याला मुख्य मार्गदर्शक जेष्ठ साहित्यिक कादंबरीकार बाबारावजी मुसळे ,माळी कर्मचारी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष श्रीकृष्ण बोळे, विदर्भ अर्बन बँक चे अध्यक्ष गजाननराव भेंडेकर महाराष्ट्र बहुजन पत्रकार संघटनेचे जिल्हा अध्यक्ष बंडुभाऊ इंगोले, कारंजा वृत्तकेसरीचे मुख्य संपादक रामदास मिसाळ आदींची मंचावर उपस्थिती होती .
यावेळी प्रथम संत भगवानबाबा यांच्या प्रतिमेचे मान्यवरांचे हस्ते पूजन व दीप प्रज्वलन करून करून कार्यक्रमाला सुरवात करण्यात आली .यावेळी ज्येष्ठ साहित्यिक बाबाराव मुसळे यांनी कारंजा वृत्त केसरीचा दिवाळी अंक म्हणजे कारंजेकरां करीता उत्कृष्ट मेजवानीच असल्याचे प्रतिपादन करून कारंजा वृत्त केसरीच्या दिवाळी अंका बाबत चे विशेष महत्व विषद करीत या साप्ताहिकाच्या प्रवासाचे वर्णन करून शुभेच्छा दिल्या . तर कार्यक्रमाचे अध्यक्ष पाहुणे म्हणून वाशिम जिल्ह्याचे निवासी उपजिल्हाधिकारी मा विश्वनाथरावजी घुगे यांनी
अध्यक्षीय मार्गदर्शन करताना आज वृत्त पत्रकारितेत असलेल्या अडचणी आणि आजची पत्रकारिता यावर मत मांडताना कारंजा वृत्तकेसरी या साप्ताहिकाच्या स्वातंत्र्य लिखाण आणि न्यायिक उत्तरदायित्व याबाबत अभिनंदन केले शिवाय वृत्त केसरी चा नियमित दरवर्षी दिवाळी अंक निघणे म्हणजे कारंजा वासियांकरिता अभिमानास्पद बाब असल्याचे प्रतिपादन केले.
माळी कर्मचारी संघाचे जिल्हाध्यक्ष श्रीकृष्णराव बोळे यांनी पत्रकार क्षेत्रातील त्यांच्या अनुभव विशद केला तर कार्यक्रमात नफा न तोटा या तत्त्वावर एखाद्या साप्ताहिकाने दिवाळी अंक पुस्तकी स्वरूपात काढणे हे जिकरीचे काम असताना कारंजा वृत्तकेसरीने ने दिवाळी अंक काढून प्रकाशित करणे हे कारंजा नगर वासियां करिता आनंदाची बाब असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र बहुजन पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष बंडूभाऊ इंगोले यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्य संपादक रामदास मिसाळ यांनी केले तर सूत्र संचालन हेमंत पापळे यांनी केले.तर आभार विशाल वैद्य सर यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाराष्ट्र बहुजन पत्रकार संघाचे तालुका कार्यकारणी पदाधिकारी आणि सभासदांनी अथक प्रयत्न केले
Post a Comment