कारंजा उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांची कारवाई - SDPO Karanja lad solved the online fraud case
ऑनलाईन फसवणुक झालेली ४०,३५०/- रुपये मुळ मालकाला परत
कारंजा उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांची कारवाई
कारंजा लाड (www.jantaparishad.com) दि. ११ - उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालय, कारंजा येथे मा पोलिस अधीक्षक साहेब यांच्या आदेशानुसार एन.सि.सि.आर.(नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टर) पोर्टल सुरू करण्यात आले आहे. कारंजा डिव्हिजन मधिल सायबर क्राईम संबंधी तक्रारी ची दखल येथे घेण्यात येते.
पोलिस स्टेशन कारंजा शहर येथे दि.04/09/23 रोजी वेदश्री कृष्णकुमार लाहोटी रा कारंजा लाड यांची ऑनलाईन 40350/-रूपयांची फसवणूक झाली होती. सदर तक्रारदार यांची तक्रार नोंदवून एन सि सि आर पोर्टल वर सदरची तक्रार अपलोड केली. पोर्टल व्दारे मिळालेल्या माहिती वरून तक्रारदार यांचे पैसे हे HDFC बॅक मधिल अजय कुमार शाखा- नवाडा बिहार या व्यक्ती च्या बॅक अकाउंट मध्ये गेल्याचे समजले, ती रक्कम त्वरित होल्ड करण्यात आली. सदर पैसे परत तक्रारदार यांच्या अकाउंट ला परत मिळणे बाबत बॅके ला पत्रव्यवहार करून आज रोजी तक्रारदार यांच्या बॅक अकाउंट मध्ये पैसे परत करण्यात आले.
सदर कार्यावाही पोलिस अधीक्षक श्री बच्चन सिंह, अप्पर पोलीस अधीक्षक श्री भारत तांगडे, उपविभागीय पोलिस अधिकारी श्री जगदिश पांडे कारंजा यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलिस स्टेशन चे पोलीस निरीक्षक भुशन गावंडे, पोकाॅ वैभव गाडवे, मनापोकाॅ स्वाती धुरजळ यांनी केले. या कामगीरी मुळे तक्रारदार यांनी समाधान व्यक्त केले. ऑनलाईन फसवणूक झाल्यास संबंधित पोलिस स्टेशन ला तक्रार नोंदवावी व 1930 वर तात्काळ फोन करून एन सि सि आर पोर्टल वर तक्रार नोंदवावी असे आवाहन सायबर पोलिस स्टेशन वाशिम च्या वतीने करण्यात आले.
Post a Comment