Header Ads

राज्यात मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी योजना मुलींना करणार लखपती - Lek Ladki Yojana Mahiti Information in Marathi

राज्यात मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी योजना मुलींना करणार लखपती - Lek Ladki Yojana Mahiti Information in Marathi


राज्यात मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी योजना’ मुलींना करणार लखपती

Lek Ladki Yojana 

मुंबई, दि. 11 : राज्यात मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी योजना (Lek Ladki Yojana) राबवून गरीब कुटुंबातील मुलींना लखपती करण्याचा निर्णय काल दि.१० ऑक्टोबर रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.  बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

  1. पिवळ्या व केशरी रेशनकार्डधारक कुटुंबात मुलीचा जन्म झाल्यावर ५ हजार रुपये, 
  2. इयत्ता पहिलीत गेल्यावर ६ हजार रुपये, 
  3. सहावीत गेल्यावर ७ हजार रुपये, 
  4. ११ वीत गेल्यावर ८ हजार रुपये, 
  5. १८ वर्षे पूर्ण झाल्यावर ७५ हजार रुपये, 
  6. अशा रितीने एकूण त्या मुलीस १ लाख १ हजार रुपये एवढा लाभ मिळेल.

या संदर्भात अर्थसंकल्पीय भाषणात उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केली होती.  माझी कन्या भाग्यश्री ही योजना अधिक्रमित करून १ एप्रिल २०२३ पासून जन्मणाऱ्या मुलींसाठी ही योजना राबविण्यात येईल.

मुलींच्या जन्मास प्रोत्साहन देऊन त्यांचा जन्मदर वाढविणे, मुलींच्या शिक्षणास चालना देणे, मुलींचा मृत्यूदर कमी करणे व बालविवाह रोखणे, कुपोषण कमी करणे आणि मुलींना शिक्षणासाठी प्रोत्साहन देणे यासाठी ही योजना राबविण्यात येईल. १ एप्रिल २०२३ नंतर कुटुंबात जन्मणाऱ्या १ अथवा २ मुलींना त्याच प्रमाणे १ मुलगा व १ मुलगी असल्यास मुलीला या योजनेचा लाभ मिळेल.  दुसऱ्या प्रसुतीच्या वेळी जुळी अपत्ये जन्माला आल्यास १ मुलगा किंवा दोन्ही मुलींना या योजनेचा लाभ मिळेल.  मात्र आई किंवा वडिलांनी कुटूंबनियोजन शस्त्रक्रीया करणे आवश्यक राहील.  १ एप्रिल २०२३ पूर्वी १ मुलगी किंवा मुलगा आणि आणि त्यानंतर दुसरी मुलगी किंवा जुळ्या मुली जन्माला आल्यास त्यांना या योजनेचा लाभ मिळेल.  जुळ्या दोन्ही मुलांना स्वतंत्र लाभ देण्यात येईल. लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न १ लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे.

No comments

Powered by Blogger.