Header Ads

आभा व गोल्डन कार्ड काढण्याची धडक मोहीम - Abha and Golden Card campaign in washim district

आभा व गोल्डन कार्ड काढण्याची धडक मोहीम - Abha and Golden Card campaign in washim district


आभा व गोल्डन कार्ड काढण्याची धडक मोहीम

वाशिम दि.9 (जिमाका / www.jantaparishad.com)जिल्ह्यात " आयुष्मान भव " या उपक्रमांतर्गत आभा व गोल्डन कार्ड (Abha Card Golden Card) काढण्यापासून वंचित राहिलेल्या लाभार्थ्यांचे गोल्डन व आभा कार्ड काढण्याची धडक मोहीम 7 ऑक्टोबर 2023 पासून प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रांअंतर्गत येत असलेल्या उपकेंद्रामध्ये राबविण्यात आली. या मोहिमे दरम्यान आभा कार्ड व गोल्डन कार्ड काढण्यापासून वंचित असलेले लाभार्थींना या ठिकाणी बोलवून त्यांचे कार्ड काढण्यात आले. मोहिमे दरम्यान जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुहास कोरे यांनी प्रत्यक्ष भेट देऊन आभा कार्ड कसे काढावे याबाबत प्रत्यक्ष कृती करून दाखविली.

          जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील ज्या ठिकाणी या दिवशी गोल्डन व आभा कार्ड काढण्याबाबत शिबिर घेण्यात आले, त्या ठिकाणी जिल्हास्तरीय पर्यवेक्षक व जिल्हास्तरीय अधिकारी तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी प्रत्यक्ष भेट देऊन ही मोहीम यशस्वीपणे राबविली. यामध्ये जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र पार्डी टकमोर अंतर्गत येत असलेल्या कळंबा महाली,खरोळा,भटउमरा, सावंगा व प्राथमिक आरोग्य केंद्र पार्डीटकमोर याप्रमाणे बऱ्याच गावांना प्रत्यक्ष भेटी देऊन गोल्डन कार्ड व आभा कार्ड स्वतः काढून दाखविले. एकही लाभार्थी गोल्डन कार्ड व आभा कार्डपासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्याबाबत सर्व आरोग्य विभागातील वैद्यकीय अधिकारी, समुदाय आरोग्य अधिकारी व आरोग्य कर्मचारी यांना सूचना दिल्या. प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र येथे औषधी पुरेशा प्रमाणात उपलब्ध असल्याचे सांगितले.

No comments

Powered by Blogger.