Header Ads

प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा फुले जनआरोग्य योजना - PMJAY Hospital List Washim District / MJPJAY Hospital List Washim District

प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा फुले जनआरोग्य योजना  - PMJAY Hospital List Washim District / MJPJAY Hospital List Washim District


प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा फुले जनआरोग्य योजना    

5 लक्ष रुपयापर्यंतच्या शस्त्रक्रिया व उपचार मोफत     

लाभ घेण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

वाशीम जिल्ह्यातील समाविष्ट हॉस्पिटल ची यादी 

वाशिम दि.9 (जिमाका / www.jantaparishad.com) - केंद्र शासनाची अत्यंत महत्वाकांक्षी आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (PMJAY) व राज्य शासनाच्या महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना (MJPJAY - Mahatma Jyotirao Phule Jan Arogya ) जिल्ह्यात 23 सप्टेंबर 2018 पासून राबविली जात आहे.या योजनेचा जिल्ह्यातील रुग्णांनी लाभ घ्यावा.असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

            या योजनेमध्ये 1359 गंभीर आजारांवर 5 लक्ष रुपयापर्यंतच्या शस्त्रक्रिया व उपचार अंगीकृत शासकीय आणि खासगी रुग्णालयातून पूर्णतः मोफत केले जातात.हे आरोग्य विमा कवच प्रति कुटुंब,प्रति वर्ष 5 लक्ष रुपये अशा स्वरूपात मिळत असते.  

            सन 2011 च्या सामाजिक, आर्थिक,जातीय जनगणनेनुसार एकूण 5,08,350 या योजनेमध्ये पात्र आहेत.संपूर्ण राज्यामध्ये "प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेमध्ये एकूण 1024 रुग्णालये अंगीकृत आहेत.त्यापैकी 226 शासकीय रुग्णालये असून 798 खासगी रुग्णालये अंगीकृत आहेत. 

PMJAY Hospital List Washim District / MJPJAY Hospital List Washim District

         जिल्ह्यातील जिल्हा रुग्णालय, वाशिम,उपजिल्हा रुग्णालय, कारंजा, ग्रामीण रुग्णालय, मंगरुळपीर, बालाजी बाल रुग्णालय, वाशिम, बिबेकर हॉस्पिटल,वाशिम. देवळे हॉस्पिटल, वाशिम, कानडे बाल रुग्णालय, वाशिम.लाईफ लाईन हॉस्पिटल, वाशिम.बाहेती हॉस्पिटल वाशिम,वोरा हॉस्पिटल,वाशिम,वाशीम क्रिटिकल केअर सेन्टर,वाशिम,गजानन बाल रुग्णालय हॉस्पिटल,वाशिम.श्री. गजानन बाल रुग्णालय,मालेगांव या रुग्णालयाचा समावेश आहे.

            आजपर्यंत या योजनेमधून 22,976 लाभार्थीना उपचार आणि शस्त्रक्रियाचा लाभ मिळाला असून यावर 98 कोटी 12 रुपये खर्च शासनाकडून करण्यात आला आहे. 

                1 सप्टेंबर 2023 पासून "आयुष्मान भव " (Ayushyaman Bhav) या मोहिमेअंतर्गत- आयुष्मान आपल्यादारी 3.0 उपक्रम जिल्ह्याभरात राबविण्यात येत आहे. त्यामध्ये सर्व पात्र लाभार्थीना त्यांचे आयुष्मान कार्ड्स शासनाकडून केवायसी द्वारे तयार करून दिले जात आहे.हे कार्ड तयार करण्याकरीता आशा सेविका,ग्रामपंचायत केंद्र चालक, सेतू सुविधा केंद्र, आरोग्य यंत्रणा आणि अंगीकृत रुग्णालयातील आरोग्यमित्र लाभार्थीच्या आधार कार्डसच्या साहाय्याने आयुष्मान कार्ड (Ayushyaman Card) तयार करून देत आहे.याकरिता राष्ट्रीय स्वास्थ्य प्राधिकरण यांचेकडून एक मोबाईल अँप्लिकेशन (mobile application) तयार करण्यात आले आहे. 

Web Portal: 

https://beneficiary.nha.gov.in

Mobile Application:

https://play.google.com/store/apps/details?id=com.beneficiaryapp 

                 या लिंकद्वारे अप्लिकेशन डाउनलोड करून लाभार्थी बेनेफिशरी पर्याय निवडून स्वतःचे कार्ड स्वतः तयार शकतात. जिल्हा प्रशासनातर्फे या मोहिमेमध्ये सर्व ग्रामपंचायत,सर्व आरोग्य केंद्रे आणि शहरी भागात वॉर्ड निहाय कार्ड काढण्याचे शिबिरे आयोजित केली आहेत,आतापर्यंत 1,80,130 पात्र लाभार्थीना कार्ड्स देण्यात आले आहेत. मागील 7 दिवसात 4 हजारापेक्षा जास्त आयुष्मान कार्डचे केवायसी करण्यात आले आहेत.

                  प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा लाभ मिळण्याकरिता आयुष्मान कार्ड आवश्यक असल्याने सर्व पात्र लाभार्थींनी आपले कार्ड त्वरित काढून घेणे गरजेचे आहे.असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.

No comments

Powered by Blogger.