Header Ads

वाशिम व अकोला जिल्ह्यातील ६०६ अवसायनात संस्थांची नोंदणी रद्द होणार - Registration of 606 cooperative societies of Washim and Akola districts will be cancelled

वाशिम व अकोला जिल्ह्यातील ६०६ अवसायनात संस्थांची नोंदणी रद्द होणार - Registration of 606 institutions of Washim and Akola districts will be cancelled


वाशिम व अकोला जिल्ह्यातील ६०६ अवसायनात संस्थांची नोंदणी रद्द होणार 

आक्षेप दाखल करण्यास 23 ऑक्टोबरची मुदत

वाशिम दि.9 (जिमाका / www.jantaparishad.com) वाशिम व अकोला जिल्ह्यातील 606 अवसायनात सहकारी संस्थांची नोंदणी रद्द करण्यात येणार आहे. त्याबाबत 23 ऑक्टोबरपूर्वी सहायक निबंधक सहकारी संस्था (पदुम) यांच्याकडे आक्षेप दाखल करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

वाशिम जिल्ह्यात 215 दुध उत्पादक सहकारी संस्था, 14 कुक्कुटपालन सहकारी संस्था व 62 शेळी-मेंढी पालन सहकारी संस्था अशा एकूण 291 सहकारी संस्था अवसायनात आहेत.अकोला जिल्ह्यात 283 दुध उत्पादक सहकारी संस्था, 16 कुक्कुटपालन सहकारी संस्था व 16 शेळी-मेंढी पालन सहकारी संस्था अशा एकूण 315 सहकारी संस्था अवसायनात आहेत.

या संस्थांचे कामकाज बंद असणे, उद्देशानुसार कामकाज नसणे या कारणांमुळे अवसायनात काढण्यात आल्या. त्यात 238 संस्थांना अवसायनात होऊन 6 वर्षांहून अधिक कालावधी झाला.संस्थांच्या मालमत्तेचे, दप्तराचे, संस्थेचे देणे-घेणे आदीबाबतीत कार्यवाही करण्यासाठी अवसायकांना संस्थेचे दप्तर प्राप्त न होणे, नोंदणी पत्त्यावर कार्यस्थळी संस्थेचा ठावठिकाणा न मिळणे, संस्थेचे तत्कालीन अध्यक्ष,समिती सदस्य,व्यवस्थापक यांचा ठावठिकाणा न मिळणे आदी बाबी निदर्शनास आल्या आहेत.त्यामुळे या संस्थांच्या नोंदणी रद्द करण्याची कार्यवाही सुरू करण्यात येणार आहे. अशा संस्थांची यादी कार्यालयाच्या नोटीस बोर्डवर प्रसिद्ध करण्यात येत आहे.

 संबंधितांनी आपले म्हणणे लेखी स्वरुपात सहायक निबंधक सहकारी संस्था (पदुम) अकोला यांचे कार्यालय, द्वारा जिल्हा दुग्धव्यवसाय विकास अधिकारी, शासकिय दुध योजनेच्या बाजूला,मुर्तिजापूर रोड,अकोला यांच्या कार्यालयात 23 ऑक्टोबरपर्यंत कार्यालयीन वेळेत दाखल करावेत.अन्यथा संस्थांची नोंदणी रद्द करण्याची कारवाई करण्यात येईल.असा इशारा सहायक निबंधकांनी दिला आहे.

No comments

Powered by Blogger.