Header Ads

वाशिम जिल्हा परिषदेत 'पंचप्रण' शपथ कार्यक्रम संपन्न : Washim Zilha Parishad (ZP) : Panchpran Shapath taken by all

वाशिम जिल्हा परिषदेत 'पंचप्रण' शपथ कार्यक्रम संपन्न : Washim Zilha Parishad (ZP) : Panchpran Shapath taken by all


मेरी मिट्टी- मेरा देश अभियान जिल्हाभरातील कार्यालयांत घेतली 'पंचप्रण' शपथ

वाशिम जिल्हा परिषदेत 'पंचप्रण' शपथ कार्यक्रम संपन्न

वाशिम (www.jantaparishad.com) दिनांक 9 ऑगस्ट - 'मेरी मिट्टी, मेरा देश'  अभियानां (Meri Maati Mera Desh Abhiyan) तर्गत जिल्ह्यातील सर्व ग्राम पंचायती मध्ये व पंचायत समितीच्या कार्यालयात आज (दि.9) लोकप्रतिनिधी व अधिकारी- कर्मचारी यांच्या वतीने पंचप्रण शपथ घेण्यात आली. जिल्हा परिषदेच्या वसंतराव नाईक सभागृहातही पदवीधर शिक्षक आमदार किरण सरनाईक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत यांच्यासह अधिकारी -कर्मचारी यांनी हातात माती घेऊन  सामुहिक पंचप्रण शपथ घेतली.

ZP Washim Rangoli for celebration of Meri Maati Mera Desh Abhiyan


यावेळी जिल्हा परिषदेचे अति. मुख्‍य कार्यकारी अधिकारी सुनिल निकम, मुख्य लेखा व  वित्त  अधिकारी दिनकर जाधव, सामान्य प्रशासन विभागाचे उप  मुख्य कार्यकारी अधिकारी यशवंत सपकाळे,‍ पंचायत विभागाचे उप  मुख्य कार्यकारी अधिकारी दिगंबर लोखंडे, शिक्षण अधिकारी राजेंद्र ‍ शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.

केंद्र व महाराष्ट्र शासानाच्या वतीने देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव समारोपानिमित्त मेरी मिट्टी, मेरा देश हे अभियान राबविण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार संपूर्ण राज्यात व देशात मेरी मिट्टी, मेरा देश (मिट्टी को नमन, विरो को वंदन) हे अभियान राबविण्यात येत आहे. त्यात राज्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीत या अभियानांतर्गत 9 ते 16 ऑगस्ट दरम्यान विविध प्रकारचे पाच उपक्रम राबविण्यात येणार आहेत. त्यात 'वसुधा वंदन' उपक्रमांतर्गत प्रत्येक ग्रामपंचायतीत गावातील योग्य ठिकाण निवडून 75 देशी वृक्षांची लागवड करून अमृत वाटिका तयार करण्यात येणार आहे. सर्वत्र पंचप्रण शपथ घेऊन या अभियानाची सुरुवात करण्यात आली आहे.

भारताला २०४७ पर्यंत विकसित बनविण्याचे स्वप्न साकार करण्याची, गुलामगिरीची मानसिकता मुळापासून उखडून टाकण्याची, देशाच्या समृद्ध वारशाचा अभिमान सदैव बाळगण्याची, एकता व एकजूट यासाठी कर्तव्यदक्ष राहण्याची, नागरिकाचे कर्तव्य बजावण्याची व देशाचे रक्षण करणाऱ्यांचा कायम आदर राखण्याची शपथ यावेळी घेण्यात आली.

आमदार आणि सीईओ यांच्यासह कर्मचाऱ्यांनीही घेतले सेल्फी

ZP CEO Vasumana Pant Taking Selfie on Selfie Point

'मेरी मिट्टी, मेरा देश'  अभियानांतर्गत जिल्हा परिषद परिसरात तयार करण्यात आलेल्या सेल्फी पॉईंट (Selfie Point in Washim Zilha Parishad (ZP)) वर शिक्षक आमदार किरण सरनाईक (MLC Teacher's Constituency) आणि मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत (ZP Washim CEO Vasumana Pant) यांच्यासह विभाग प्रमुखांनी सेल्फी (फोटो) घेतले. त्यानंतर कर्मचाऱ्यांनी सेल्फीसाठी एकच गर्दी केली होती.  गर्दी वाढल्यानंतर रांगा लावुन महिला व पुरुष कर्मचाऱ्यांनी सेल्फी घेतले आणि समाज माध्यमावरही अपलोड केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक पंचायत विभागाचे उप  मुख्य कार्यकारी अधिकारी दिगंबर लोखंडे यांनी केले. आभार प्रदर्शन  उप शिक्षण अधिकारी गजानन डाबेराव यांनी केले.

कोई टिप्पणी नहीं

Blogger द्वारा संचालित.