Header Ads

रस्ता सुरक्षा कार्यक्रम : नेत्र तपासणी व चष्मेसाठी शिबीर - RTO Washim organises Camp for eye examination and spectacles

रस्ता सुरक्षा कार्यक्रम : नेत्र तपासणी व चष्मेसाठी शिबीर - RTO Washim organises Camp for eye examination and spectacles

रस्ता सुरक्षा कार्यक्रम : नेत्र तपासणी व चष्मेसाठी शिबीर 

उप प्रादेशिक परिवहन विभाग वाशिम चे आवाहन 

वाशिम, दि. 09 (जिमाका / www.jantaparishad.com) : जिल्हयातील प्रवासी बस वाहन चालक व जड वाहन चालकांसाठी रस्ता सुरक्षा कार्यक्रमाअंतर्गत रस्त्यावरील अपघातांचे  प्रमाण कमी करण्याच्या दृष्टीने मोफत नेत्र तपासणी व नंबरचे चष्मे देण्याचे तालुकानिहाय शिबीर कार्यक्रम आयोजित आल्याची माहिती उप प्रादेशिक परिवहन (RTO Washim organises Camp for eye examination and spectacles) अधिकारी ज्ञानेश्वर हिरडे यांनी दिली.

सर्व वाहन चालकांनी नेत्र तपासणी शिबीराचा लाभ घ्यावा. वाहन चालकांनी स्वत:चे आधारकार्ड व ड्रायव्हिंग लायसन्स स्वत:जवळ ठेवावे.

मोफत नेत्र तपासणी व नंबरचे चष्मे देण्याचे तालुकानिहाय शिबीर कार्यक्रम 

  1. वाशिम तालुका - 10 व 11 ऑगस्ट 2023 रोजी नेत्र रुग्ण विभाग, जिल्हा सामान्य रुग्णालय, वाशिम येथे सकाळी 9 ते दुपारी 12 व सायंकाळी 4 ते 6 वाजेपर्यंत. 
  2. मंगरुळपीर तालुका - 25 ऑगस्ट रोजी नेत्र रुग्ण विभाग, ग्रामीण सामान्य रुग्णालय, मंगरुळपीर येथे सकाळी 9 ते दुपारी 1 या वेळेत. 
  3. मालेगांव तालुका - 22 ऑगस्ट रोजी नेत्र रुग्ण विभाग, ग्रामीण सामान्य रुग्णालय मालेगांव येथे सकाळी 9 ते दुपारी 1 वाजेपर्यंत. 
  4. कारंजा तालुका - 23 ऑगस्ट रोजी नेत्र रुग्ण विभाग, ग्रामीण सामान्य रुग्णालय, कारंजा येथे सकाळी 9 ते दुपारी 1 वाजेपर्यंत आणि 
  5. रिसोड तालुक्यात 24 ऑगस्ट रोजी नेत्र रुग्ण विभाग, ग्रामीण रुग्णालय, रिसोड येथे सकाळी 9 ते दुपारी 1 वाजेपर्यंत 

शिबीराचे आयोजन करण्यात आल्याची माहिती उप प्रादेशिक परिवहन अधिकारी ज्ञानेश्वर हिरडे यांनी दिली.

No comments

Powered by Blogger.