वाशिम जि. प. चे प्रविण राऊत ठरले गुणवंत कर्मचारी - Pravin Raut of ZP Washim awarded as meritorious employee in state list !
वाशिम जि.प. चे प्रविण राऊत ठरले गुणवंत कर्मचारी
राज्यातील ३७ जणांना गुणवंत कर्मचारी पुरस्कार
तब्बल १३ वर्षांनंतर या पुरस्काराच्या यादीत वाशिम जिल्हा परिषद कर्मचाऱ्याचे नाव
वाशिम (www.jantaparishad.com) दि १८ : ग्रामविकास विभागांतर्गत शासकीय योजना, प्रकल्प राबविताना विशेष वैयक्तिक योगदान देणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र शासनाकडून गुणवंत पुरस्कार दिला जातो. तब्बल १३ वर्षांनंतर या पुरस्काराच्या यादीत वाशिम जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्याचे नाव झळकले आहे. जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाचे वरिष्ठ सहायक प्रविण रामकृष्ण राऊत यांना गुणवंत कर्मचारी पुरस्कार जाहिर झाला असुन त्यांना लवकरच सन्मानित केले जाणार आहे. (Pravin Raut of ZP Washim awarded as meritorious employee in state list !)
ग्रामविकास विभागांतर्गत राज्य शासनाच्या तसेच केंद्र शासन पुरस्कृत अनेक योजना व प्रकल्प राबविले जातात. विविध योजना, प्रकल्प राबविताना संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांचे प्रशासकीय व तांत्रिक कौशल्य पणाला लागते. विशेष वैयक्तिक कौशल्य व गुणवत्तेचे दर्शन घडवून जिल्हा परिषदेचे अनेक अधिकारी व कर्मचारी हे योजना, प्रकल्प यशस्वी करण्यात हातभार लावतात. अशा अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप म्हणून राज्य शासनाकडून सन २००५-०६ पासून गुणवंत अधिकारी, कर्मचारी पुरस्कार दिला जातो.
सन २०२०-२१ या वर्षांतील राज्यातील जिल्हा परिषदेच्या एकुण ३७ गुणवंत अधिकारी, कर्मचाऱ्यांना हा गुणवंत पुरस्कार जाहीर झाला असून, यामध्ये वाशिम जिल्हा परिषदेचे वरिष्ठ सहायक प्रविण राऊत यांचाही समावेश आहे. प्रवीण राऊत यांनी सामान्य प्रशासन विभागात सेवा देताना केलेल्या उल्लेखनीय कामगिरीची दखल ग्रामविकास विभागाने घेतली आहे.
Post a Comment