Header Ads

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन - Maharashtra Rajya Marathi Patrakar Sangh news washim

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन - Maharashtra Rajya Marathi Patrakar Sangh news washim


सेवाभावी संस्थांची पत्रकार संघटना गृहीत धरुन अधिस्विकृती समितीवरील चुकीच्या नियुक्त्या रद्द करा

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

वाशिम दि १७ - धर्मदाय आयुक्त यांच्याकडे सोसायटी व ट्रस्ट ऍक्ट अंतर्गत नोंदणी असलेल्या सेवाभावी संस्थांना पत्रकार संघटना गृहित धरुन अधिस्वीकृती समितीवर सदस्य म्हणुन चुकीच्या पध्दतीने देण्यात आलेल्या नियुक्त्या रद्द करण्यासाठी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, वाशिम (Maharashtra Rajya Marathi Patrakar Sangh, Washim) च्यावतीने जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले.

माहिती आणि जनसंपर्क विभागाने थेट सेवाभावी संस्थांनाच पत्रकार संघटना गृहित धरले असून, याबाबत चौकशी करुन चुकीचे प्रस्ताव मंजुर करणार्‍या संबंधितांवर कारवाई करावी अन्यथा आंदोलन करण्यात येईल असा इशारा  यावेळी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, मुंबई च्यावतीने देण्यात आला आहे.

निवेदन देतेवेळी, प्रदेश सदस्य बाळासाहेब देशमुख, विदर्भ अध्यक्ष निलेश सोमाणी, जिल्हाध्यक्ष निनाद देशमुख, माजी जिल्हाध्यक्ष गजानन देशमुख, माजी जिल्हाध्यक्ष पंकज गाडेकर, रिसोड तालुकाध्यक्ष गणेश देगावकर, प्रमोद खडसे, संजय खडसे, अशोक चोपडे, नारायण आरु, अजय जाधव, अमर रासकर यांच्यासह पत्रकारांची उपस्थिती होती. या निवेदनाच्या प्रतिलिपी जिल्हा माहिती अधिकारी, वाशिम यांना देण्यात आल्या आहेत.

कोई टिप्पणी नहीं

Blogger द्वारा संचालित.