Header Ads

जैन मुनीच्या हत्येच्या निषेधार्थ कारंजात भव्य निषेध मोर्चा - Nishedh Morcha in Karanja Lad by Sakal Jain Samaj Bandhav

जैन मुनीच्या हत्येच्या निषेधार्थ कारंजात भव्य निषेध मोर्चा - Nishedh Morcha in Karanja Lad by Sakal Jain Samaj Bandhav

जैन मुनीच्या हत्येच्या निषेधार्थ कारंजात भव्य निषेध मोर्चा 

आरोपींना कडक शिक्षा करण्याची मागणी 

कारंजा (का.प्र. / www.jantaparishad.com) दि. 18 - अहिंसेच्या भारत देशात सकल दिगंबर जैन समाजाच्या आस्थाचे केंद्र असलेले प्रसिद्ध जैन संत प पु.गणधर आचार्य कुंथुसागर जी महाराज यांचे प्रभावक शिष्य प पु आचार्य कामकुमारनंदी मुनि महाराज यांचे कर्नाटक राज्यातील बेळगाव जिल्ह्यातील चिकोडी तालुक्यातील हिरेकुड आश्रमातुन दि. 5 जुलै रोजी अपहरण करून शरीराला करंट देऊन निर्मम हत्या काही समाजकंटकाकडुन करण्यात आली. या क्रूरता पूर्वक घटनेने देशातील सकल जैन समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या असुन या संतापजनक घटनेचा निषेध करण्यासाठी व जैन धर्म , जैन तीर्थक्षेत्र , जैन साधू संत व जैन समाज यांच्या संरक्षणाच्या मागणीसाठी सकल जैन समाजाच्या वतीने आज दिनांक १८ जुलै रोजी भव्य मुक मोर्चा चे आयोजन करण्यात आले होते.

Nishedh morcha by Sakal Jain Samaj Pics Karanja lad 18 July 2023

माननीय तहसीलदार मार्फत केंद्र व कर्नाटक सरकारला एका निवेदनाद्वारे आरोपी ला कडक शिक्षा करण्याची मागणी सकल जैन समाजाने भव्य मुकमोर्चाच्या माध्यमातून केली. तत्पूर्वी सकाळी 11 वा. गुरू श्री. देवेंद्र किर्ती सभागृहात प पु ज्ञेयश्री माताजी यांचे उदबोधन झाले. यावेळी माताजी म्हणाल्या की झालेली घटना अतिशय निंदनीय आहे महाराजांची तर घटना होऊन गेली पण भविष्यात कोणत्याही धर्माच्या साधुसंतांच्या बाबतीत अश्या प्रकारच्या घटना होता कामा नये. देशभरात जिथे जिथे जैन साधुसंत जैन मंदिरात विराजमान आहेत त्यांचे ही संरक्षण झाले पाहिजे प्रथम जवाबदारी हि तर समाजाचीच आहे, परंतु सरकारच्या माध्यमातून ही अश्या प्रकारची सुविधा होणे आवश्यक आहे.

जैन स्वाध्वी वात्सल्यनिधी श्रमणी आर्यिका प पु ज्ञेयश्री माताजी व बाल ब्रह्मचारी भारती दीदी यांच्या सान्निध्यात मुकमोर्चाला प्रारंभ झाला. हा मोर्चा भगवान महावीर चौक येथुन निघुन महात्मा फुले चौक, इंदिरा गांधी चौक मार्गे नेहरू चौक, जयस्तंभ चौक मार्गे तहसील कार्यालयावर पोहोचला. 

तिथे नायब तहसीलदार हरणे साहेब यांनी तहसीलदाराच्या वतीने सकल जैन समाजाच्या वतीने राजाभाऊ डोणगावकर, शिरिषभाऊ चवरे, निनाद बन्नोरे , अविनाश खंडारे, जगदीश भाऊ चवरे, प्रसन्न आग्रेकर, हितेंद्र गंधक, भारत हरसुले, अविन नांदगावकर, निरंजन वैद्य, दिलीप उन्होने, प्रज्वल गुलालकरी, सतीश भेलांडे यांचे हस्ते निवेदन स्वीकारले.

श्री देवेंद्रकिर्ती सभागृहा अॅड संदेश जिंतुरकर यांनी निवेदनाचे वाचन केले तर किरण चवरे यांनी संचलन व आभार प्रदर्शन केले तर तहसील कार्यालयावर सभेचं संचलन व आभार प्रदर्शन भारत हरसुले यांनी केले

मोर्चा यशस्वी करण्यासाठी हितेश रुईवाले , सुदेश गुळकरी , सतिश भेलांडे , दिलीप उन्होंने , प्रसन्ना आग्रेकर , निरंजन वैद्य , हितेंद्र गंधक, पंकज जैन, गणेश धुरावत यांच्यासह अनेकांनी प्रयत्न केले

यावेळी ह्या मोर्चा त बहुसंख्य सकल जैन समाज बांधव व भगीणी उपस्थित होत्या

No comments

Powered by Blogger.