Header Ads

PM Rashtriya Bal Puraskar 2024 Application Date Extended - प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारांसाठी अंतिम तारीख 31 ऑगस्टपर्यंत

PM Rashtriya Bal Puraskar 2024 Application Date Extended - प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारांसाठी अंतिम तारीख 31 ऑगस्टपर्यंत
From Wikipedia


PM Rashtriya Bal Puraskar 2024 Application Date Extended

प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारांसाठी अंतिम तारीख 31 ऑगस्टपर्यंत 

नवी दिल्ली, 10 जुलै : प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्करांसाठीची मुदतवाढ (PM Rashtriya Bal Puraskar 2024 Application Date Extended) 31 ऑगस्ट 2023 पर्यंत करण्यात आलेली आहे. 

केंद्रीय महिला व बालविकास मंत्रालयाच्यावतीने प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार प्रदान केला जातो. यासाठी अर्ज पाठविण्याची तारीख ही 31 जुलै 2023 पर्यंतची होती, ती आता वाढवून 31 ऑगस्ट 2023 पर्यंत करण्यात आलेली आहे. प्रधानमंत्री राष्ट्रीय पुरस्कार (PMRBP), 2024 करिता अर्ज सादर करण्याच्या प्रक्रियेची संपूर्ण माहिती https://awards.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असल्याचे केंद्रीय पत्र सुचना कार्यालयाने काढलेल्या प्रसिद्धी पत्रकातून दिली आहे.  

असामान्य धाडस, क्रीडा, समाजसेवा, विज्ञान आणि तंत्रज्ञान, पर्यावरण, कला आणि संस्कृती तसेच नवोन्मेष या क्षेत्रातील अतुलनीय कार्याला राष्ट्रीय पातळीवर नावलौकिक मिळवून देण्याच्या उद्देशाने या पुरस्कारांची सुरुवात करण्यात आली आहे.

भारताचे नागरिकत्व आणि रहिवासी असलेले मुल, मुली ज्यांचे वय 18 वर्षांहून अधिक नाही असे या पुरस्कारांसाठी अर्ज करू शकतात. अथवा कोणही भारतीय नागरिक देखील प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारां (PM Rashtriya Bal Puraskar 2024) साठी पात्र असणाऱ्या मुला मुलींचे नामांकन करू शकते. या पुरस्कारांसाठी चे अर्ज विहित केलेल्या https://awards.gov.in या संकेतस्थळाच्या माध्यमातूनच स्वीकारण्यात येतील.

कोई टिप्पणी नहीं

Blogger द्वारा संचालित.